गाव
प्रत्येकाला गाव असावं मोकळा श्वास घेण्यासाठी .शहरापासून लांब जाण्यासाठी गाव असाव .गावातील स्वच्छ हवा प्रत्येकाला घेता यावी .शहरातील प्रदुषित हवेपासून लांब जाण्यासाठी गावासारखे ठिकाण नाही .बालपणाच्या आठवणीत पुन्हा जाण्यासाठी गावाला जाता आले पाहिजे व त्या आठवणीत रमून लहान झाले पाहिजे व मोठेपणाच्या अहंपणातून बाहेर पडता आले पाहिजे .गावात गेल्यावर शहरातील प्रदूषित विचार सोडता आले पाहिजे .गावातील नैसर्गिक वातावरणाचा परिणाम आपल्या मनावर झाला पाहिजे.गावातील ओढे नाले नद्या डोंगर दरी शेती यात घालवलेले बालपण मनाला सुखद आनंद देवून जातात .शहरातील गर्दी व माणसातला बेगडीपणा यापासून सुटका होण्यासाठी गावाला गेले पाहिजे .गावातील गाई म्हशी बकर्या त्यांचे शुध्द दुध दही तुप यांचा स्वाद गावाला गेल्यावर मिळतो .मोकळ्या गच्चीत झोपल्यावर आकाशातील तार्यांचे दर्शन डोळ्यांना सुखद आनंद देवून जातो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गावाला येवून आईच्या हातचे जेवण हे फार रूचकर असते तसे ते जगाच्या कानाकोपर्यात कुठेही मिळत नाही.रात्री झोपही अशी शांत लागते की किती तरी दिवसांनी आपण अशी झोप अनूभवतो.
शहरातील बकालपणाचा कंटाळा घालवण्यासाठी गावाला जायला हवं .मनातील अशुध्द विचार घालवण्यासाठी गावाला मध्ये मध्ये फेरफटका मारला पाहिजे .मीपणा कमी करण्यासाठी गावाला फेरी मारली पाहिजे.पण प्रत्येकाच्या नशिबात गाव नसते.ज्यांना गाव आहे ते बरेच वर्ष गावाला फिरकत नाहीत .गावाला जाणे त्यांना कमीपणाचे वाटते तेथील लोकांचे विचार त्यांना बुरसट वाटतात कारण शहरात जावून मोठे ते आॅफिसर झालेले असतात त्यामुळे ते स्वताला वेगळे समजतात असे लोक गावाला जरी आलेत तरी मी कुणीतरी मोठा आहे व मलाच अक्कल आहे गावाचे लोक अडाणी आहेत विचार जुने आहेत असले विचार त्यांच्या डोक्यात असल्यामूळे खरा आनंद घेवू शकत नाही व जे घेतात ते खरंच भाग्यवान असतात.बघा तुम्ही स्वताला व विचारा आपला अनुभव स्वतालाच.गावाबद्दल अभिमान बाळगा व खरा आनंद घ्या.
प्रा. दगा देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment