सत्य कल्पनेपेक्षा भयंकर
रात्री आपल्याला स्वप्न पडते किंवा आपण कल्पना करतो विविध.घरी वडील आई लवकर नाही आलेत किंवा आपली मुले घरी वेळेवर नाही आलेत तर आपल्या मनात विविध विचार येतात .नको ते विचार येतात व एकदा त्यांना बघितले तर जीव भांड्यात पडतो. वाढदिवस असतो सर्व एकत्र जेवायला जातात .मजा येते कारण वडिलांचा वाढदिवस असतो 75 वा .उद्या असंकाही घडेल याची कुणीही कल्पना केलेली नसते आणि दुसर्या दिवशी वडिलांना ठेच लागायचं निमित्त होते व जातात.आदल्या दिवशी मजेत हसणारे वडिल आज सरणावर जळता आहेत म्हणून म्हणतो सत्य कल्पनेपेक्षा भयंकर असते .
शिवाजी राजा होतो हे जिजाबाई बघतात व त्यांच्या मुळेच शिवाजी राजा झाला असं त्यांनी शिवाजीला घडवले.किती आनंदात होते महाराज की आईचे स्वप्न पूर्ण केलं पण सत्य वेगळंच होतं राजा झाल्यानंतर 11दिवसांनीच जिजाबाईनी जगाचा निरोप घेतला .हे बघतांना महाराजांना किती दूख झालं असणार .त्यांनी कधीही अशी कल्पना केली नसेल की माॅ एवढ्या लवकर जातील पण सत्य भयंकर असते.काही वेळेस प्रवासाला सर्व कुटूंबाचे सदस्य जातात .किती आनंदाच्या कल्पना असतात पण येतांना काही वेळेस अपघातहोतो व काही सदस्य कायमचे जगाचा निरोप घेतात किंवा सर्वच जगाचा निरोप घेतात म्हणून सत्य कधी समोर येईल भयंकर रूपात व त्यासाठी आपल्या हातात काहीच नसते .म्हणून आहे त्या दिवसांचा आनंद लूटावा चांगल्या मार्गाने .बघा जमतं का
प्रा. दगा देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment