नागोबा
आज नागपंचमी म्हणून नागाला बरेच जण दुध पाजतात पण नाग दुध पित नाही .खरे नाग समाजात माणसाच्या रूपात आहेत त्यांना दुध पाजले काय व पुजा केली काय ते एक दिवस उलटणार व दंश करणार .बरेच दिवस कळत नाही की ते नाग आहेत आपण त्यांना मदत करतो त्यांना मान देतो आपल्या घरी जागा देतो आपल्या मनात जागा देतो पण त्यांच्या मनात आपल्याविषयी वेगळेच शिजत असते त्याची पूसटशी कल्पना आपल्याला नसते व अचानक एकदिवशी आपले सर्व लूबाडून नेतात विश्वास घात करतात आपल्यावरच फणा काढून उभे ठाकतात व प्रसंगी दंश करायला मागेपुढे पाहत नाही असे नाग समाजाला कलंक असतात त्यांच्यामूळेच माणसा माणसातील विश्वास कमी होतो.हे नागोबा आपण जे सांगितले तसे मान डोलावतात व पाठीमागून यांचे कटकारस्थान चालू असते व वेळ आली की पाठीमागून दंश करतात .माणूस हे बघून चक्रावतो ढासळतो सावरायला वेळ लागतो प्रसंगी प्राणाला मुकतो म्हणून नागोबा ओळखणे फार अवघड असते .ओळख होईपर्यंत आपण पूर्ण लुटलेलो गेलो असतो .असले नाग आपल्या अवतीभवतीच असतात फक्त डोळसपणे बघायचा दृष्टीकोन ठेवला तर त्या नागांची चाल लक्षात येते ह्या नागोबांना ऐकू येते शिक्षित अशिक्षित असतात मोठ्या पदांवर असतात.मौठमोठ्या महालात तसेच साध्या घरात राहतात .यांना चांगले गोड बोलता येते .खर्या नागापेक्षा हे नाग फार खतरनाक असतात म्हणून आजच्या दिवसापासून अशा नागांपासून सावध रहा व स्वताचा बचाव करा.हे नाग कुणाला घाबरत नाही यांना इज्जत नसते .कोणत्याही थराला हे जातात दंश करताना कोणतेही उपकार व नाते हे विचारात घेत नाहीत.बघा विचार करा व अशा नागांपासून बचाव करायला जमत का ते पहा
प्रा. दगा देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment