गाडी व आपल्या जीवनातले साम्य
गाडी व आपल्या जीवनात बरेच साम्य आहे .गाडी व आपले शरीर सारखेच .आपल्या शरीरातला आत्मा जर निघून गेला तर आपण निर्जिव होतो तसेच जोपर्यंत आपण गाडीत बसून चालू करत नाही तोपर्यंत ती निर्जिव सारखीच दिसते .गाडीसमोर स्पिड ब्रेकर आला की आपण गाडी स्लो करतो तसेच आपल्या जीवनात अडथळे आले किंवा संकटे आले की आपले जीवन ही स्लो होते व गाडीप्रमाणे हळूच आपण मार्ग काढतो .ज्याला गाडी स्लो करता नाही आली तर गाडीचे व आपले नुकसान होते तसेच जीवनात अडथळे आल्यावर जर स्लो नाही झालोत तर मात्र जीवनात दु:खाचा सामना करावा लागतो.मोकळा रस्ता आहे तर स्पिड वाढवला पाहिजे नाहीतर दुसर्या गाडीवाले ठोकतील त्याचप्रमाणे जीवनात समृध्दी आली की तिचाही उपभोग चांगल्या प्रकारे घेता आला पाहिजे नाहीतर पैसा साठवून एक दिवस दुसरेच घेवून जातील.काहीवेळेस आपण गाडी रिर्वस घेतो मग टर्न मारून पुढे जातो तसेच जीवनात काहीवेळेस माघार घेवून दोन पाऊले मागे आले पाहिजे व नंतर परत पुढे जाण्याचा मार्ग शोधला पाहिजे तरच आपल्या जीवनाची गाडी व्यवस्थित चालेल.मन स्थिर ठेवून गाडी चालवली नाही तर अपघात होवून गाडी तर जातेच व गाडीमधलेही तसेच जीवनात संयम नाही ठेवला म्हणजे व्यसनाधीन झालो तर आपणही बरबाद होतो व घरचेही .गाडीत इंधनशिवाय गाडी चालत नाही तसेच आपल्या जीवनात प्रेरणादायी माणसारूपी इंधन नसेल तर जीवन पुढे जात नाही .म्हणून जीवन जगतांना गाडी कडून बरेच शिकण्यासारखे आहे . बघा जमतं का व पटतं का?
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment