Skip to main content

वात्रट मुलगा

जास्त अक्कल असलेला मुलगा
लहानपणापासून माझ छोट स्वप्न होतं की आपल घर असावं छान मुलं असावेत .संस्कारी असावेत .राहणी साधी असावी .व जेजे आपल्याला नाही मिळाल ते आपल्या मुलांना मिळाव म्हणून सर्व गरजा पुरवण्याचा प्रयत्न केला पण मला नव्हत माहित की त्याचा उलटा परिणाम होईल .माझी इच्छा नसताना सुध्दा तुला वाटेल तसा वागतोस .साध्या सिनेमागृहात तुला पिंचर आवडत नाही .साध्या हाॅटेलमध्ये जेवायला आवडत नाही .सायकलवर काॅलैजला जाणे म्हणजे तुला कमीपणा वाटतो .माॅल मध्ये पिंजर बघणे .पिज्जा बर्गर कोणतीही किंमतीचा विचार  न करता बसामजा मारणे .साध्या ब्लेड ने दाढी न करणे .साध्या सलून मध्ये कटिंग न करणे .आणि माझी इच्छा काय की जेथे जाईल तेथे टाॅप मध्ये राहणे. पण सर्वांच्या मागे मार्कस .कारण तुलााफक्त आपल्या अपेक्षा कशा पूर्ण होतील हेच बघणे .आईबापांच्या इच्छेला किंमत नाही .स्वता जेवण केल्यावर प्लेट बेसिन मध्येच टाकून देणे .स्वताहून कोणतेही कामे  न करणे .दिवसभर पुण्याला काय अन मुंबईला काय मोबाईल वर वेळ काढणे.  आईवडिलांशी हूज्जत घालणे .एका वाया गेलेल्या मुलाचे लक्षण आहे .
       अरे ज्या अपेक्षा तुला वाटतात त्या तू स्वता नोकरी लागल्यावर पूर्ण कर आता तुला जेवढी गरज आहे त्यासाठी आम्हीाआहोत पण बापाकडे पैसे आहेत म्हणून त्याच्या जीवावर उड्या मारणे थांबव.नोकरी लागल्यावर स्वताच्या जीवावर घर घे .व घरासाठी जे जे लागत ते सर्व कर.आणी स्वताच्या जीवावर मजा मार.तुझ्या अपेक्षा वाढवायलाच मीच कारणीभूत आहे .पण यापुढे सारासार विचार कर  व वाग.

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...