वाट पाहाणे
प्रत्येक जण बघतो
कुणाची अन कुणाची वाट।
बर्याच वेळा असतो नाईलाज
म्हणून लागते काहीवेळा वाट।।
बाळाच्या जन्माची बघतात
नऊ महिने नऊ दिवस वाट।
असते ती वाट बघणे चांगले
अन येणार असते आनंदाची लाट।।
बायको बघते नवर्याची वाट
नसते तिचे चित्त जागेवर।
नवरा वागतो मात्र बिनधास्त
देतो मनात येईल ते उत्तर।।
आईवडिल बघतात मुलांची वाट
बघता बघता चुकतो काळजाचा ठोका।
सारखी नजर असते आवाजावर
केव्हा ऐकू येईल गोड हाका।।
नोकरदार बघतात पगाराची वाट
असते नजर एक तारखेवर।
आल्यावर होतो फार आनंद
मग सांगत सुटतात आला आला पगार।।
काही जण बघतात पाहूण्याची वाट
करतात स्वागत त्यांच्या येण्याचे।
असतो तो सुखद आनंदाचा क्षण
असले पाहूणे असतात भाग्याचे।।
कुणाच्या निवृतीची बघतात काहीजण वाट
असते लक्ष त्यांच्या निवृतीच्या तारखेवर।
त्याच्या जाण्यावर असतो त्यांचा आनंद
म्हणून तर मन नसते भानावर।।
काहींनी दिला असतो त्रास फार
म्हणून त्याला जाण्याची बघतात वाट।
नसतो स्वभाव त्याचा चांगला
कारण लावली असते त्याने सर्वांची वाट।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment