शरीरातला देव व घरातला देव
आपले शरीर पंचमहाभूतांनी बनलेले आहे.म्हणजेच पृथ्वी आप तेज वायु आणि आकाश हिच ती पंचमहाभूते.आपला शरीरातला मांसल भाग म्हणजेच पृथ्वी आप म्हणजेच पाणी तेज म्हणजेच शरीरातला जठराग्नी वायु म्हणजेच शरीरातील हवा आणि मोकळी जागा म्हणजेच आकाश .जसे बाहेर आहे तसेचआपल्या शरीरात आहे .बाहेर जे जे पंचमहाभूते आहेत ते ते आपल्या शरिरात आहेत.गंमत म्हणजे हे भूते एकमेकांना खाण्यासाठी आतूरलेले असतात जसे पाणी अग्नीला विझवून टाकतो आकाशात हवा लूप्त होते .अग्नीमूळे पाण्याची वाफ होते .मांसल भाग अग्नि जाळून टाकतो म्हणजेच हे सर्व एकमेकांचे शत्रू आहेत तरी ते एकत्र नांदतात कारण त्यांना ताब्यात ठेवणारा आत्मा त्यात असतो जोपर्यंत आत्मा शरीरात असतो तो पर्यंत कुणाची हिंमत नाही की एकमेकांवर तूटून पडायची .गुण्यागोविंदाने एकमेकांना मदत करतात जसेकी एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ.पण एकदा शरिरातून आत्मा गेला रे गेला की हे सर्व एकमेकांवर हल्ला करतात .आत्मा गेल्यावर हे सर्व आपआपल्या जागी निघून जातात .मांसल भाग पृथ्वीत मिळून जातो वायू हवेत विसावतो अग्नि अग्नित विरून जातो पाणी ही नाहीसे होते व थोड्याच दिवसात सर्व निघून फक्त हाडे शिल्लक राहतात व काही दिवसांनी त्यांचेही विघटन होते .एका आत्मामुळे हे सर्व नांदत होते शरिरात पण तो गेल्यामुळे सर्व विखूरलेत.
त्याच प्रमाणे प्रत्येक घरात एक कुणीतरी घराचा अत्मा असतो म्हणजे मुख्य व्यक्ती असते व ती सर्वाना ताब्यात ठेवते म्हणजेच तिच्या तालावर सर्व घरातले फिरत असतात प्रत्येक जण वेगळा विचार करणारे असतात पण त्या व्यक्तीमुळे सर्व जण समजून घेतात एकमेकांना व मदत करतात आणि गुण्यागोविंदाने राहतात.जोपर्यंत ती व्यक्ती असते तोपर्यंत कुणीही विखूरले जात नाही आपला खरा स्वभाव कुणीही दाखवत नाही त्यामुळे घराची प्रगती दिसू लागते पण ती व्यक्ती घरातून कायमची निघून गेली तेव्हा हे सर्व सदस्य एकमेकांवर तूटून पडतात प्रत्येक आपला विचार मांडायला सूरवात करतो .कुणीही कुणालाही काहीही मर्यादा न ठेवता बोलत सुटतो म्हणजेच एकमेकांवर शाब्दिक किंवा शारिरीक हल्ला करतात व थोड्याच दिवसात सर्व सदस्य विखूरले जातात .कारण घरातला देवच गेल्यावर सर्व कंट्रोल सुटतो व सर्वजण आपआपल्या मार्गाने निघून जातात म्हणून शरिरातला देव व घरातला देव यांना जपावे व त्यांची काळजी घ्यावी कारण ते आहेत तरच आपले अस्तिव टिकून आहे बघा विचार करा आणि जमतं का तेवढे बघा
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment