Skip to main content

असामान्य माणूस

असामान्य माणूस

काही घरात किंवा प्रत्येक dept.मध्ये एक असा माणूस असतो की त्याच्यामूळे सर्व जण परेशान असतात .त्याला कुणालाच समजून घ्यायचे नसते .स्वताचे नियम हे दुसर्‍यावर त्याला लादायला खूप आवडते व सर्वांना त्रास कसा देता येईल याची तो संधीच बघत असतो.आसूरी आनंद मिळवण्याचा त्याचा प्रयत्न तो कायम करत असतो.इतर सर्व मूर्ख व आपण फक्त एकटे शहाणे हा गैरसमज मनात ठेवून तो इतरांशी वागत असतो.इतरांच्या भावभावनांना त्याच्या लेखी काहीही किंमत नसते.अपमान करणे व वाईट बोलणे ही तर त्याची सवयच झालेली असते. आपल्याबद्दल लोक काय बोलतात व आपल्यामूळे त्यांना किती त्रास होतो हे जाणून घ्यायचेच नसते त्याला .मी म्हणेल ती पूर्वदिशा .त्या एका व्यक्तीमूळे सारे घर तसेच प्रत्येक खाते दुखाचा अनूभव पदोपदी घेत असते.दूसर्‍यामध्ये चांगला एखादाही गुण त्याला दिसत नाही .अशा माणसाला मरणाचा विसर पडलेला असतो.आपण ह्या पृथ्वीतलावर कायम राहाणार व आपल्याला कोणताही आजार होणार नाही व आपल्या कुटूंबात कायम बरकत राहणार असा गैरसमज त्याने करून घेतलेला असतो.असा माणूस म्हणजे प्रगतीला अडसर असतो .त्याला चांगले बघण्याची बुध्दी किंवा संस्कार मिळालेले नसतात .मग देव ही विचार करेल बाबा रे काय धूमाकूळ घालायचा तो घालून घे व जेव्हा शंभर अपराध झाले की मग तुला मी बघतो त्यावेळी तुला कुणीही वाचवू शकणार नाही व पुन्हा कोणत्या जन्मात घालायचे माणसाचा जन्म सोडून त्याचा विचार करावा लागणार. जे लोक हा लेख वाचत असतील तर कृपया आपण तसे तर वागत नाही ना किंवा आपल्यामूळे समाजातील लोकांना त्रास तर होत नाही ना  ते तपासा .बरेच जण व्ससनाधीन होऊन कुटूंबाला त्रास देतात .काही झालं तरी सुधारणे त्यांना जमत नाही .ज्या माणसावर इतर लोक अवलंबून आहेत तोच असा वागायला लागला तर कसे होईल पण त्याची बुध्दी भ्रष्ट झालेली असते.तेव्हा वेळीच सावध होण्याची गरज आहे. काहीजण घरात घाण घाण शिव्या देतात व त्यात त्यांना अभिमान वाटतो .शिक्षणामूळे त्यांच्यात काहीच फरक पडलेला नसतो शिक्षण फक्त पगार मिळवण्याचे साधन आहे असेच त्यांना वाटते .त्यांच्या वागण्याचा व शिक्षणाचा काडीचाही संबंध नसतो .काहीवेळा वाटते ते अडाणी लोक बरे यांच्यापेक्षा .हे लोक म्हणजे शिक्षित अडाणी व काही अडाणी मात्र अडाणी सुशिक्षित .बघा समाजात किंवा आपल्या घरात.

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...