वास्तव व कल्पना
सध्या वास्तवपेक्षा कल्पनेला जास्त महत्व दिसते.पण काही वास्तव कल्पनेपेक्षा भयंकर असते व घडते मात्र विचित्रचं.काय घडणार हे पण माहीत असते .आज बाहूबलीची चर्चा आहे .पिंचर बघायला कितीही पैसे मोजायला तयार होतात .पण शेवटी ती कल्पनेतूनच तयार झालेली कथा.सर्व विचारतात बाहूबली कडप्पाने का मारलेपण नक्षलवाद्यांनी आपल्या जवानांना का मारले हे कुणी विचारत नाही.एखाद्या गरीब माणसाला कुणी मदत करणार नाही पण त्याचे छायाचित्र लाखो रूपयांना श्रीमंत लोक विकत घेतात म्हणजेच वास्तवपेक्षा कल्पनेला जास्त किंमत. एखादा माणसाला जीवंतपणी कुणी नमस्कार करणार नाही किंवा भेटायला जाणार नाही पण तो गेल्यावर मात्र त्याच्या फोटोला नमस्कार करणार त्याच्या अंतविधीला त्याला भेटायला जाणार .वास्तव पेक्षा कल्पनेला महत्व जास्त.
Comments
Post a Comment