ओळख पण अनोळखी
शहरात हे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात दिसून येते.एकाच बिल्डिंगमध्ये राहून एकमेकांना लोक ओळखत नाही .कधी भेट झालीच तर अनोळखी प्रमाणे वागतात .बोलणे तर लांबच पण बघायला तयार नसतात.एकाच बिल्डिंग मध्ये सर्वांच्या वाटा वेगळ्या असतात प्रत्येकजण स्वताला श्रेष्ठ समजतो पण नसतो.याचाच गैरफायदा चोर लोक घेतात .समोर तुमच्या घरी काय घडले याचा थांगपत्ता नसतो.मोठ्या सोसायटीमध्ये तर लोकांची नावंही माहित नसतात ते कुठे कामाला आहेत हे ही माहित नसते .आपल्याच बिल्डिंगमध्ये राहतात हे ही माहीत नसतेकिंवा माहीत करायची गरज भासत नाही.आपलं कुटूंब भले व आपण हेच बर्याच वेळामाणूस जपतो .आपल्याच इमारतीत कुणिही तरी निधन पावते हे त्याला बाहेर काढल्यावर कळतं त्याच्या परिवारामध्ये कोण असत काय करतात हे ही जाणून घ्यायची इच्छा नसते.एवढा माणूस एकलकोंडा झाला आहे .काही ठिकाणी एक बिल्डिंग म्हणजे एक परिवार असे राहतात एकत्र समारंभ साजरे करतात व एकमेकांच्या मदतीला धावून जातात असे लोक खरंच भाग्यवान असतात.माणसाने विज्ञानातभरपूर प्रगती केली सर्व जग जवळ आले क्षणात इकडची माहीती तिकडे व तिकडची माहीती इकडे पाठवली जाते पण माणूस माणसापासून दूर गेला एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा उरला नाही.स्वार्थीपणा वाढला.तू केले तर मी करीन अशी भावना तयार झाली.पशूसारखीवृती तयार झाली .पैशासाठी कोणत्याही थराला माणूस जावू शकतो.देवाने त्याला निर्माण करतांना किती स्वप्न बघितले असतील पण सारे धूळिस मिळाले.काहीवेळा प्राण्यांपेक्षाही वाईट वर्तवणूक माणूस करतो .एकमेकांचा विचार करण्याऐवजी फक्त स्वताच्या कुटूंबाचा विचार .बाकी त्याला काहीही पडलेले नाही.सारेच विचित्र होत चाललेले आहे .आकाशच फाटले आहे त्याला कुठे कुठे ठिगळ देणार.बघा तुमच्या सोसायटीमध्ये लोकं असेच वागता का? चांगले वागायचं स्वतापासून प्रयत्न करू व बघू आपल्याला जमतं का?
प्रा. दगा देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment