बदलते सारे पण माणूस नाही
बदल हा तर निसर्गाचा नियम आहे .सर्व सुष्टीमध्ये सतत बदल होत असतात .पावसाळा हिवाळा उन्हाळा हे चक्र तर चालूच आहे .निसर्गामध्ये विविध झाडे पशूपक्षी याच्यांत सतत बदल होत आहेत .तसेच माणूस जन्माला येतो तेव्हापासून किती किती बदल त्याच्यात होतात .बालक कुमार अवस्था तारूण्य म्हातारपण अशा पायरीने त्याच्यात बदल होतो .व्यक्ती एकच पण बालक पासून म्हातार्या पर्यंत किती बदलतो माणूस.प्रत्येक सेकंदाला आपल्या शरीरातील हजारो पेशी नष्ट होतात व त्या ठिकाणी नवीन जन्माला येतात हा एवढा बदल आपल्या शरीरात सतत चालू असतो आणि याचा सुगावा आपल्याला काहीच नसतो मग हे सारे बदलत आहे तर काय बदलत नाही याचा विचार पुढे सांगतो.
माणूस बदलत नाही त्याचे विचार सोडायला तो तयार नसतो मी म्हणेल ती पूर्वदिशा असायला पाहिजे असे त्याला वाटते .त्याचा हेकट स्वभावात तो बदल करत नाही .जन्मापासून खडूस वृतीत बदल करत नाही .दुसर्याला त्रास देणे यात बदल करत नाही .आपल्या रागात द्वेषात त्याला बदल करावासा वाटत नाही .selfish वृतीत त्याला बदल नको असतो .मी शहाणा बाकी मुर्ख अशा विचारात त्याला बदल नको असतो .हसून दुसर्याचं स्वागत करावं असं त्याला कधी वाटतं नाही.आपलं तोंड कायम वाकडेच ठेवावे त्याला वाटते.आपल्या शरीरापासून तर निसर्गाच्या कानाकोर्यापर्यंत बदल सतत चालू असतो पण तो डोळ्यावर अज्ञानाची पट्टी बांधतो त्यामुळे तोस्वता बदलत नाही. विचार करा लग्न निमित्ताने किंवा कुणी गेले त्या निमित्ताने किती तरी गर्दी जमते व ही गर्दी अजून 50- 75 वर्षानी सर्व नाहीशी होणार व नवीन लोक येणार .
म्हणून माणसा हा बदल जर सर्वीकडे चालू आहे तर स्वतामध्ये चांगला बदल करुन आपला सर्वांना उपयोग होईल असे कर व बदल करुन घे स्वभावात स्वता संपण्याच्या आधी. स्वताच्या शरीराची राख होण्याआधी .बघ मग कसा आनंद वाटतो स्वताच्या मनाला .बघा जमतं का
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment