हसणे देवाने दिलेली देणगी
प्रत्येक माणसाला देवाने दिलेली देणगी म्हणजे हसू.हसण्याचे बरेच प्रकार आहेत काही जण चूक झाले तर स्वतावरच हसतात काही दुसर्याच्या वाईट गुणांवर हसतात .काही उगीचच हसतात .काहीचे हसणे लोभस आकर्षक वाटते व त्यांचे हसणे बघून आपले मन आनंदीत होते .पण काही राक्षसांसारखे हसतात ते बघून किळस वाटते .काही जणांवर पूर्ण जगाची काळजी आहे का असेच वाटते कारण त्यांना हसताना कुणीही बधितले नसते .हसणे म्हणजे त्यांना जमतच नाही कायम रागिष्ट चेहरा परिधान करून वावरत असतात .ज्योक्स जरी अशा लोकांनी ऐकला तरी गालातच हसताना दिसतात .पण आपल्या एका smile ने जर समोरच्याला प्रसन्न वाटत असेल तर मग का हसून त्याचे स्वागत करु नये.नवरा कामावरून आल्यावर किंवा बायको कामावरून आल्यावर घरी त्यांना एक smile देवून दमलात का बसा अस जरी केल तरी त्यांचा थकवा लगेच निघून जातो.हसत असताना अनेक ताणतणाव निघून जातात सर्व नसा मोकळ्या होतात व रक्तभिसरण व्यवस्थित चालते व फ्रेश वाटते .काही डूप्लिकेट हसतात फक्त दात दाखवतात पण मनमोकळे पणाने जेव्हा तुम्ही हसता तेव्हाच त्याचा effect चांगला जाणवतो पण सध्या हसू कमी झाले आहे व दूसर्यावर हसण्याचे प्रमाण वाढले आहे .हसण्याचे ही नियम असतात कुठे कशाला कुणाबरोबर कोणत्या जागी हसावे .काही जण स्वताच हसतात तेही चांगले असते पण स्वताची जास्त हसले तर लोक म्हणतात याला वेड लागल. काही सकाळी गार्डन मध्ये जमा होतात व हसण्याचा कार्यक्रम ठेवतात ते काही natural नसते .जेव्हा नैसर्गिक हसू मनापासून येते तेव्हा खरी मजा येते व ते मित्रांबरोबर असेल तर जास्त मजा येते .माणूस थोडा वेळ दुख विसरतो .वातावरण घरात बाहेर आपल्या अंतकरणात चांगले राहते व जगायला प्रेरणा मिळते
त्यामूळे इस्री मारलेला चेहरा असेल तर काढून टाका व समोरच्याचे स्वागत हसून करा व घरात वातावरण चांगले ठेवा बघा जमतं का
प्रा. दगा देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment