Skip to main content

सुख

सुख

माणसाच्या सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात .गाडी बंगला नोकर चाकर भरपूर पैसा असला की सुख आहे असे म्हणतात.काहीना वाटते सुूख म्हणजे मुलांची लग्न झालेली व मोठ्या छोट्या नोकरीला आहेत व त्यांना पोरं झालेली आहेत म्हणजे सुख.काहींना वाटते दोन वेळचं जेवण राहायला घर म्हणजे सुख .काहीच्या मते बायको किंवा नवरा सुंदर सुसंस्कृत प्रेम करणारे म्हणजे सुख.काहींना वाटते निरोगी शरीर म्हणजे सुख.काहींच्या मते कामसुख म्हणजे खरे सुख.दुसर्‍यांना आनंदी पाहाणे म्हणजे सुख.दुसर्‍यांना मदत करणे म्हणजे सुख.भरपूर खाणे व दूर दूर फिरायला जाणे म्हणजे सुख अशा प्रकारे व्यक्तीप्रमाणे सुखाच्या कल्पना बदलतात पण संताना काय वाटते सुख म्हणजे काय?
         ज्ञानेश्वर महाराज म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तसेच ते म्हणतात सर्व सुखाचे आगर बाप रखूमादेवीवरू .काही संत म्हणतात सुखासाठी जरी करीशी तळमळ एक वेळ जायं पंढरीशी .काही म्हणतात सर्व सुख गोडी साही शास्र निवडी रिकामा अर्धघडी राहू नको.एकनाथ महाराज म्हणतात नको नको मान  नको अभिमान सोडी मी तू पणा तोची सुखी .तुकाराम महाराज म्हणतात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधु ओळखावा व देव तेथेच जाणावा म्हणजे त्यालाच सुख मानावे. अशा शाश्वत सुखाच्या व्याख्या संतानी केल्या आहेत .सामान्य माणसांनी केलेल्या व्याख्या व संतानी केलेल्या यात जमीन आसमानचा फरक आहे .सामान्य माणसाच्या मते जे सुख आहे ते कधीतरी नष्ट होणारे आहे पण संताना जे सुख अभिप्रेत आहे ते कधीच नष्ट होऊ शकत नाही .बघूया प्रयत्न करून आपल्याला जमतं का ?
प्रा. दगा देवरे
7738601925

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...