Skip to main content

देव

देव
बरोबर आहे देवाची निर्मिती मानवाने केली पण हे सर्व सृष्टीचक्र चालू आहे ते आपोआप तर नक्कीच चालू नाही एक घर आपोआप चालत नाही तर मग हे सर्व आपोआप कसं चालेल .दुसरी गोष्ट मुंगीला जर सांगितले की असा मोबाईल असतो त्याचा आवाज एका देशातून दूसर्‍या देशात जातो व video पण दिसतो किंवा एखाद्या प्राण्याला सांगितले तर त्याच्या बुध्दिच्या पलीकडे आहे सर्व तसंच देव म्हणजे मंदिर मज्दिद मध्ये राहणारा क्षुल्लक आहे का? तो कळायला माणसाची बुध्दि अपूर्ण पडते मुंगीसारखी.ह्या विश्वात कितीतरी कोटी आकाशगंगा आहेत व त्यात न मोजता येणारे ग्रह व तारे व किती तरी कोटी पृथ्वी सारखे ग्रह आहेत    किती तरी कोटी सूर्य व चंद्र सारेच अफाट आहे याचा नूसता विचार करणे सुध्दा माणसाच्या बुध्दिच्या पलीकडे आहे .काही ग्रहावर पोहचण्यासाठी यानाने किती तरी प्रकाशवर्ष लागतात की माणसाला फक्त 100 वर्ष आयूष्य आहे.पूर्ण जीवनभर यानाने प्रवास केला तरी माणूस पोहचू शकत नाही मग सांगा तो देव काय असा मंदीर मध्ये दिसणार आहे का कुणाला? तो एवढा अफाट आहे की माणूस कल्पनाही करू शकणार नाही .वेद म्हणतात नेती नेती.त्यांनी ही हात झटकले ते म्हणतात आमच्याही बुध्दिच्या पलीकडे आहे.समजा तुमच्या बॅकेत जर 10000 रूपये असतील व तुम्हाला 20000 रूपये पाहिजे असतील तर मॅनेजर आपले वडिल असतील तरी ते 20000 देवू शकणार नाहीत कारण तेवढा बॅलन्स तुमच्याकडे नाही आहे. तसचं जे जे काही घडतं ते आपल्या कर्मानेच घडते व त्यात नियती हस्तक्षेप करत नाही .जसं पेराल तसं उगवेल. देव काय तुमचा बाॅडीगार्ड आहे का? लगेच धावत येईल तुम्हाला वाचवायला.पण जर आपले शुध्द विचार आचार असतील तर जे वाईट घडणार असते त्याची सूचना आपल्याला आधीच त्या शक्तीकडून प्राप्त होते पण आपलं लक्ष नसतं घडून गेल्यावर आपण म्हणतो की अरे असं त्या वेळी मला वाटलं होतं पण मी लक्ष दिलं नाही असा अनुभव बर्‍याच जणांना येतो ती शक्ती जरूर मदत करते पण तिच्या सारखं आपण थोड्या प्रमाणात तरी शुध्द असलं पाहिजे की तिच्यातल व आपल्यातल कनेक्शन जोडलेल असलं पाहिजे  एखाद्या मंत्र्याची तुमची ओळख आहे तर काही तुमच्या विषयी वाईट घडायच्या आधीच तो तुम्हाला सावध करतो व तुम्ही त्या प्रकरणात वाचता तसच आहे हू त्या शक्तीशी तुमचं कनेक्शन असेल तर जरूर तुम्हाला सिग्नल मिळत असतात .पण तुमची ओळख नसताना कोणत्याही व्यक्तीकडून तुम्हाला कधी सिग्नल मिळणार नाही तसेच हे पण आहे .जी अफाट शक्ती आहे तिलाच कुणी साकार रूप दिले व विविध नावं दिले व माणूसच त्याच्यात भेद करतो आहे  हा अल्ला हा राम हा येशू हा अमूक हा तमूक पण ती शक्ती एकच.हे जे होऊन गेलेत तेही त्या शक्तीचं स्मरण करतात .शिवही धानस्थ स्थिती मध्ये त्या शक्तीला स्मरत असतो .त्या शक्तीचं मोजमाप करणे म्हणजे सोपी गोष्ट नाही त्यापेक्षा चांगले कर्म करावे खरं बोलावे मदत करावी प्रामाणिकपणे कामं करावीत व सुखी जीवन जगावे .खावं प्यावं व शांत झोपावं पाहिजे तर त्या शक्तीचं स्मरण कराव .कर्म हाच खरा देव असतो व ती शक्ती कर्मामध्येही आहे .ती शक्ती सर्व ठिकाणी आहे  .तिला नमन करून माझं कर्म सूरू  तसेच बंद करतो. बघा विचार करा पटतं का? नाहीतर सोडून द्या
प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...