आज काय करावे
काहीच समजेना।
असं कसं झालं
काहीच सूचेना।।
बरेच वर्ष चालले
माझ्या आयुष्यातून।
नाही ठेवला जमाखर्च
डायरीत लिहून।।
जूने मित्र जावून नवीन आले
जमली त्यांच्याशी मैत्री।
सापडेल माझा आनंद
आहे पक्की खात्री।।
तोच सूर्य अन तोच चंद्र
तीच रात्र अन तोच दिवस।
तेच सूख अन तेच दु;ख
बघून होते मन उदास।।
तोच पावसाळा अन तोच हिवाळा
तीच गरमी अन तीच थंडी।
तेच मटन अन तेच चिकन
तीच कोंबडी अन तीच अंडी।।
आशा आहे येईल नवीन पहाट
करतील पक्षी किलबिल।
येईल नवा उत्साह
जाईल सारी मरगळ।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment