गुरू असते प्रत्येकाच्या आयुष्यात मानाचे पान।
त्याचे कुणीच नाही घेऊ शकत स्थान।।
भेटतात गुरू वेगवेगळ्या प्रकारचे।
बदल करतात आपल्या आयुष्यात आपल्या व्यक्तीमत्वाचे।।
कायम राहावे गुरूच्या चरणी लीन।
शांत चित्ताने करावे त्याचे चिंतन।।
परमेश्वरापेक्षा आहे गुरूचे स्थान वरती।
म्हणून तर करावी त्याची सदा भक्ती।।
गुरू असतो कधी आईबाबांच्या रूपात।
तर कधी असतो मित्रमैत्रिणीच्या स्वरूपात।।
कधी दिसतो पशूपक्षीच्या मध्ये।
तर कधी दिसतो झाडाझुडपा मध्ये।।
गुरूला बघण्यासाठी हवी नवी नजर।
मग दिसतो प्रत्येकामध्ये हजर।।
काहीवेळा शब्दही गुरू ठरतात।
अन अशक्य ते शक्य करून दाखवतात।।
गुरू गूरू करावा सारखा जप।
नाही लागत कोणत्या प्रकारचे पाप।।
एक गुरू आहे प्रत्येकाच्या आत।
पण नाही कुणाला कधी दिसत।।
गुरू हा गुरूच असतो।
अन त्याचा ही कुणीतरी गुरू असतो।।
प्रा. दगा देवरे
रूपारेल कांलेज मुंबई
त्याचे कुणीच नाही घेऊ शकत स्थान।।
भेटतात गुरू वेगवेगळ्या प्रकारचे।
बदल करतात आपल्या आयुष्यात आपल्या व्यक्तीमत्वाचे।।
कायम राहावे गुरूच्या चरणी लीन।
शांत चित्ताने करावे त्याचे चिंतन।।
परमेश्वरापेक्षा आहे गुरूचे स्थान वरती।
म्हणून तर करावी त्याची सदा भक्ती।।
गुरू असतो कधी आईबाबांच्या रूपात।
तर कधी असतो मित्रमैत्रिणीच्या स्वरूपात।।
कधी दिसतो पशूपक्षीच्या मध्ये।
तर कधी दिसतो झाडाझुडपा मध्ये।।
गुरूला बघण्यासाठी हवी नवी नजर।
मग दिसतो प्रत्येकामध्ये हजर।।
काहीवेळा शब्दही गुरू ठरतात।
अन अशक्य ते शक्य करून दाखवतात।।
गुरू गूरू करावा सारखा जप।
नाही लागत कोणत्या प्रकारचे पाप।।
एक गुरू आहे प्रत्येकाच्या आत।
पण नाही कुणाला कधी दिसत।।
गुरू हा गुरूच असतो।
अन त्याचा ही कुणीतरी गुरू असतो।।
प्रा. दगा देवरे
रूपारेल कांलेज मुंबई
Comments
Post a Comment