अफाट व अतिसूक्ष्म
त्याचं काय वर्णन करावं. शब्द ही महती गाताना खुजे पडतात .शब्दाने ही वर्णन नाही करता येत .किती अफाट. मोजमाप करणं अशक्य एकदा सागराला कृष्णाने मुलाच्या बारशाचे निमंत्रण दिलं सागर हसू लागला व म्हणाला वाहन घेवून ये घ्यायला.मग कृष्णाने होकार दिला व ठरलेल्या तिथीला कृष्ण गेला सागराला बोलवायला .सागर बोलला कशात नेणार मला व हसू लागला मग कृष्णाने हातावरचा एक केस काढला व त्या केसाच्या टोकावर सागराला गायब केलंव म्हणाला ह्या केसाच्या फक्त अग्रभागावर तुला गायब केलं व बाकी तो केस उरला माझ्या एका केसामध्ये एवढी ताकद तर माझ्या शरिरावर असंख्य केस आहेत त्यांच्यामध्ये किती ताकद मग माझ्या हाता पायात केवढी ताकद मग माझ्यात किती ताकद .अंदाज ही लावू शकत नाही .ही एक कथा आहे दृष्टांत म्हणजे तो किती अफाट .सारे विश्व त्याच्यामध्ये असून तो उरला आहे जे त्याने अर्जुनाला विश्वरूप दाखवून तो किती अफाट याची प्रचिती दिली मग त्या उलट तो तेवढाच अतिसूक्ष्म आहे माणसाने अणू रेणू प्रोटान इलेक्र्टान चा शोध लावला आता सध्या त्याच्यापुढे जावून एका कणाचा शोध लावला व त्याला त्यांनी देवकण नाव दिले व आतापर्यंतचा सर्वात सूक्ष्म मग त्याच्याहूनही कैकपटीने सूक्ष्म आहे तो व तो सापडणे अशक्य आहे व हा सूक्ष्म प्रत्येकाच्या आत राहून आपल्या सर्व इंद्रियांना कार्यवत ठेवतो व त्यालाच आपण आत्मा म्हणतो व तो आहे म्हणून आपण व सर्व प्राणीमात्र जीवंत दिसतात मग जेदगड माती आहे त्यामध्येही तो आहे पण वेगळ्या सूक्ष्म रूपात जेणेकरुन ते हालचाल करत नाही निर्जिव दिसतात .एकीकडे एवढा अफाट तर दुसरीकडे एवढा सूक्ष्म .हे दोन्ही समजणे माणसाच्या आवाक्याच्या बाहेर आहे मग माणूस म्हणतो देवच नाही .आपल्या नाही म्हणण्याने तो नसणार असं थोडचं आहे पण कशानेही तो सापडत नाही फक्त आणि फक्त प्रेमानेच त्याला बांधता येते .प्रेमाची बेडी राधिकेसारखी त्याला बांधता येते .प्रेमाचा भुकेला असतो तो .एकदा तो सापडला मग त्याचे वेड लागल्याशिवाय राहात नाही मग मनात शांतीचा पूर वाहू लागतो व जग हे वेगळेच दिसू लागते भासमान. त्याची जाणीव अस्तिव सर्वकडे दिसू लागते माणूस वेगळ्याच विश्वात रमू लागतो .असं होत जेव्हा त्याची ओळख होते तेव्हा .बघा तुम्हाला वाटतं का असं
प्रा. दगा देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
अप्रतिम सर
ReplyDelete