Skip to main content

चोर

चोरी
झटपट पैसा कमवण्याचा मार्ग म्हणजे चोरी.चोरी करणे हा धंदाच झालााआहे त्यांना ना भावना ना कोणती संवेदना फक्त दुसर्‍याच्या कष्टांचे  फक्त लुबाडणे हेच माहित   असते.कोण कधी जातो यावर नजर ठेवून असतात व संधी आलीाकी मग साधतात.मोठ्या कष्टाने पै पै जमवायची आणि ह्या हरामखोरांनी लूबाडायची कोणताही विचार न करता.प्रत्येक वस्तूवर किती भावना असतात .काही प्रेमाच्या प्रतिक असतात तर काही मध्ये आठवणी दडलेल्या असतात तो नुसता दागिना नसतो तर त्यामध्ये आपल्या प्रिय व्यक्तिच्या भावना दडलेल्या असतात पण ह्या नालायक चोरांना भावना कशाशी खातात हेच माहित नसते .मग हळूहळू यांची टोळी तयार होते व मग प्लान करून घर फोडतात .अशा लोकांना पोलीस व कायदा यांचा धाकच उरलेला नाही म्हणूनच तर असे कृत्य करतात अशा लोकांना चाबकाने फोडले पाहिजे किंवा जन्म ठेप दिली पाहिजे .असे चोर अशिक्षित व सूशिक्षित असतात .त्यात भुरटे म्हणजे साधी चोरी करणारे असतात .बर्‍याच वेळा रत्यांवर चालतांना बाईच्या अंगावर दागिने खेचतात मग ती पडली काय व मेली काय यांचे काही देणेघेणे नसते त्यांना कारण आईबहिण ते मानतच नाहीत ते मानतात फक्त पैसा.तसेच मोबाईल आणि पैशांच पाकिट ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये चढतांना मारणे हितर यांची हातचालाखी असते.बॅगा चोरी करणे .म्हणून जीवन जगताना फार गाफिल होऊन चालणार नाही .तसेच गाड्या चोरणे व ते विकणे हा तर यांचा धंदाच झाला आहे .सायकली चोरणे.पुढे जावून मग हे निगरगठ्ठ होतात आणि बॅक लूटणे सराफाची दुकाने फोडणे अशा मोठ्या चोर्‍या करायला लागतात .एका देशातून दुसर्‍या देशात माल चोरून पाठवणे असा धंदा चालू होतो म्हणून माणसाला कुठे हे चोर नडतील काहीच सांगता येत नाही अशांचा कडक बंदोबस्त केल्याशिवाय हे थांबणार नाहीत मग पोलीस ही गुन्हा नोंदवून घेतात .काहीचा तपास लागतो व काहीचा कधीच लागत नाही.एकतर व्यसन लागल्यामुळे चोरी करतात किंवा नोकरी धंदा नसल्याने चोरी करतात किंवा पूर्ववैर मुळे चोरी करतात किंवा चैन करण्यासाठी चोरी करतात म्हणून प्रत्येकाने सावध राहाले पाहिजे व हे आपल्याही  घरात घडू शकते याची जाणीव ठेवावी .वेळोवेळी सावधानता बाळगणे हाच उपाय .या गोष्टीला पूर्णपणे कायदा वा पोलीस थांबवू शकत नाही म्हणून आपणच आपली सुरक्षा केलेली बरी.घरात मौल्यवान वस्तू न ठेवणे हाच उपाय.बर्‍याच वेळा पोलीस प्रामाणिक काम करतात व काही प्रमाणात फक्त गुन्हा नोंदवण्याशिवाय काहीच करत नाहीत .ते तरी कुठे कुठे लक्ष देणार.चोरीचं प्रशिक्षणाशिवाय हे होत नाही म्हणून फेसबुक व whatsapp वर आपली व्यक्तिगत माहीती टाकू नये.चोरीच्या बहाण्याने खून मारामारी होतात व नको तो मनस्ताप होतो.छान चाललेले जीवन विस्कळीत होते व एक असुरक्षतेची भावना निर्माण होते पण कुठेही चोर चोरी करताना दिसला तर जरूर लोकांच्या निर्दशनाला आणून द्यावे .
       आता काही चोर चांगले असतात त्यापैकी  आपणही आहोत त्याच्यातले .मनचोर चित्तचोर ह्रदयचोर माखनचोर असे चांगले चोर असतात .एखाद्यावर काहीजण एवढे प्रेम करतात की त्याचे चित्त चोरतात .त्याच्या मनात स्वताची जागा तयार करतात .त्याला स्वताच्या ठिकाणी जागा देतात .त्याची झोप चोरतात .त्याचे दुख चोरतात .असल्या चोरांमुळे प्रगती माणूसकी वाढीस लागते.समाजाला अशा चोरांची
आवश्यकता आहे.बघा विचार करा तुमच्या अवतीभवती कोणते चोर दिसतात .ओळखा व स्वताची सुरक्षा करा
प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...