🌹🌹सावध व्हयरे मूढा देह थोडा पाण्याचा बुडबुडा🌹🌹
आज सकाळी जाग आली तेव्हा विचार केला की रात्रभर आपण गाढ झोपेत होतो मनात कोणताच विचार नाही म्हणजे आपण एवढी विश्रांती घेत होतो की स्वताच्या शरीराचेही भान उरले नव्हते म्हणजे आपण कुठे होतो .कोणता राग नव्हता कोणाविषयी व्देष नव्हता आनंद नव्हता दु:ख नव्हते सर्वांच्या पलीकडे गेलेली अवस्था व अशी अवस्था फक्त झोपेत होते परंतु संताच्या बाबतीत ते अशी अवस्था जागृतपणे अनूभवतात परंतु सामान्य माणूस मात्र झोपेत अनूभवतो म्हणून तर सकाळी उठल्यावर आपल्याला ताजेतवाने वाटते .मनात कोणताच चांगला किंवा वाईट विचार नसतो झोपेत पूर्ण विश्रांती असते मनाला व म्हणूनच शरिराला अशी कला काहीजण जागृत असतांना शिकतात व जीवनभर वेगळ्याच आनंदाच्या डोहात उड्या मारतात .झोपेत अशी अवस्था येण्यापेक्षा जागृतपणे आली तर मात्र माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल शेवटी विचार केला की जीवन म्हणजे पाण्याचा बुडबुडाचा की.उद्या एका माणसाच्या मुलीचे लग्न आहे तिच्यासाठी जीवनभर स्वप्न बघितले व ते पूर्ण होण्यासाठी एक दिवस उरलेला असतो पण रात्रित त्याला हार्टअॅटेक येतो किंवा तिला येतो व नवरी म्हणून सजलेली न बघता स्मशानात सजवावी लागते किंवा बापाला लग्नात न बघता तिला त्याला स्मशानात न्यावे लागते .असेच असते जीवन .कधी कोणत्या क्षणाला काय होईल ते सांगता येत नाही.मुलांना लहानाचं मोठे करतो शिक्षण देतो नोकरी मिळते व आपले स्वप्न साकार झाले असे वाटत असतांना त्याचाच मृत्यू काहींच्या नशिबीत येतो व क्षणात स्वप्नाचा चक्काचूर होतो .बर्याच वेळा आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मूले कष्ट घेतात व एक दिवशी त्यांना चांगली नोकरी मिळते व ती बातमी पालकांना सांगायची असते त्याआधीच वडिलांचा किंवा आईचा मृत्यू झालेला असतो व त्या मूलाला नोकरी मिळूनही ते शल्य जीवनभर बोचत राहते.काहीवेळा आईवडिलांनी मूलांना चांगले जीवन मिळण्यासाठी स्वता भरपूर सुखांचा त्याग करतात व मुलांना चांगल्या जागेवर नोकरी मिळते किंवा व्यवसाय भरभराटीला येतो आणि सुखाचे दिवस आपण आता उपभोगू त्याआधीच वडिलांचा मृत्यू होतो .काही जणांना ऐन सुखात असताना आजाराचा सामना करावा लागतो तेव्हा पूर्ण कुटूंबच कोलमोडतं .काहीही त्यावेळी आपण करू शकत नाही कारण डाॅंक्टरांनी सांगितले असते की तो काही दिवसांचा सोबती आहे .बघणे शिवाय आपल्याकडे काहीच नसते .बर्याच वेळा माणूस हतबल होतो.
अशा अनेक अनपेक्षित गोष्टी घडतात की माणूस आतून तूटून जातो कोलमोडतो .जीवनभर काहीतरी दु:ख मनात घेवून माणूस जीवन जगत असतो .पाण्याच्या बुडबुडाप्रमाणेच आयूष्य क्षणभंगूर असते.अशा सर्व दु:खातून किंवा सूखातून अलिप्त होण्यासाठी देवाने झोप म्हणून खूप सूंदर गोष्ट सर्व प्राणीमात्राला देणगी दिलेली आहे व त्या अवस्थेत आपण सर्व गोष्टीपासून चार पाच तास का होईना अलिप्त होतो पण संताच्या बाबतीत मात्र वेगळे असते त्यांना जागृतपणीच अशी अवस्था प्राप्त झाल्यामूळे कितीही संकटे आलीत तरी त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही कायम आनंदी असतात व अशा संकटापासून ते स्वताला वेगळे करतात म्हणून त्यांच्या मनातील अवस्था वेगळ्याच विश्वात असते .जी अवस्था त्यांना प्राप्त करण्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतात ती अवस्था प्रत्येक प्राणीमात्राला देवाने झोप देवून बहाल केलेली आहे व शेवटी कायमची झोप देवून तो सर्वांना सर्व गोष्टीपासून सूटका करतो म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मेल्यावरी मिळे मोक्ष ते अतिमूर्ख .जिवंतपणीच संत लोक तो आनंद घेत असतात बघू या प्रयत्न करून आपल्यालाही जमतं का
प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई
Comments
Post a Comment