Skip to main content

भावांमधील नाते

भावांमधील नाते

आईवडिलांना वाटायचे भावाला भाऊ पाहिजे म्हणून अनेक घरात बरेच भावंडे असायचे .तसे लहानपणी भाऊ एकमेकांसाठी जीव टाकायचे .एकत्र खेळणे एकत्र कामे करणे विनोद करणे .शाळेत एकत्र जाणे .घरामध्येही दादा म्हणून मागे मागे फिरणे .एकमेकांची काळजी घेणे .एकाला लागले तर दुसर्‍याच्या डोळ्यात पाणी यायचे .एकमेकांचे कपडे घालणे .दादाही आपल्या लहान भावाची काळजी घ्यायचा .स्व:ताला कमी घेवून आपल्या भावाच्या गरजा पुरवायचा .आई सांगायची काही झालं तरी एकमेकांची साथ सोडायची नाही.तेही आईला वचन द्यायचे आम्ही कधीही साथ सोडणार नाही कितीही मतभेद झाले तरी .आईवडिलांनाही धन्य वाटायचे .भरून पावलो असं वाटायचे.एकमेकांसाठी त्यागाची भावना असायची .असे मजेत चालले असताना भावा भावामध्ये काय झाले
           भावांचे लग्न झालेत व तेथूनच   संबंधामध्ये दुरावा सुरू झाला .जमीनीच्या वाटणी मागू लागले एवढंच नाही एकाला थोडी जास्त जमिन गेली तर हमरितुमरी वर यायले लागले .कोर्टकचेर्‍या सूरू झाल्या .एकमेकांचे तोंड बघणे म्हणजे अपशकून असे मानू लागले.घरांच्या विभागणीवरून वाद निर्माण सूरू झालेत .आइवडिलांचा सांभाळ कुणी करायचा याबद्यल भांडणे सूरू झालेत .त्यांचा सांभाळ करण्यासाठी अंधिक जमिन व पैसे याची मागणी करू लागलेत.बहिणिंना दिवाळीला कोण साडी घेणार म्हणून बहिणिंची वाटणी करायला लागलेत .आई एका भावाकडे व वडील दूसर्‍याकडे असे चित्र दिसू लागले .काहीवेळा मुले असूनही आईवडिल मुलिकडे दिसतात .काही वेळा सर्व असूनही आई वृद्धाश्रम मध्ये दिसते .वाटणिसाठी एकमेकांचा खून सूद्धा करतात .आज जर नजर टाकली तर 95% भाऊ भाऊ एकत्र फिरतांना दिसत नाही व एकमेकाशी बोलतही नाही .एकमेकांच्या घरी जात नाही.काहीतर एवढे कट्टर असतात एकाचा मृत्यू झाला तर अंतविधिलाही जात नाही .एकमेकांच्या लग्न कार्याला जात नाही.एखाद्या भावाला अपघात झाला किंवा आजारपणामूळे अॅडमिट व्हावे लागले तर त्याला भेटायला न जाता वरून भोगेल अजून तो अशी भाषा वापरतात.एकाच आईच्या ऊदरात जन्म घेवून एवढी दुश्मनी कूठून घूसली कोण जाणे.आपण लहानपणी दिलेल्या आणाभाका सर्व विसरलेत.जो कुणी हा लेख वाचत असेल त्याने किंवा तिने विचार करा की आपण भावंडे खरंच बोलत नाहीत का.तसे असेल तर सारे विसरून फोन लावा व माफी मागा किंवा भेटायला जा.काही वर्षानंतर या पृथ्वीवर दोघं नसणार . परस्परांबद्यल आदर बाळगा.एक श्रीमंत असेल व दूसरा गरीब असेल तर ती दरी येवू न देता आपण भावंड आहोत याची जाणीव ठेवून एकमेकाबद्दल संबंध चांगले ठेवा .प्रेमाणे दादा म्हणून हाक मारा.एकाने जरी केले तरी हे लिहिण्याचे सार्थक झाले असे मी म्हणेन.आम्हि भाऊ भाऊ मित्रासारखे आहोत .आधी अनूभवले मग सांगितले

प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅंलेज

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...