कांदा व वांदा
काल गावाहून मुंबईला परत आलो .गावाकडील परिस्थिती पाहून फार वाईट वाटले कारण गावाला एक जण सांगत होता की कांद्याचा भाव 100 किलो ला 85 रूपये होता म्हणजे एक रूपया किलो सुध्दा नव्हता कांदा.कांद्याचे पिक घेतांना किती कष्ट घ्यावे लागतात .कांद्याचे बियाणेच एवढे महाग असते की ते घेण्यासाठी नाकीनऊ येते शेतकर्याचे .मग त्या बियाणापासून त्याची रोपे तयार करणे व त्यालाही एकमहिना लागतो .शेतीची मशागत करून मजूर लावून एक एक रोपांना हातात घेवून त्याची लागवड करावी लागते .लावताना योग्य खत द्यावे लागते.मग त्याला पाणी द्यावे लागते काही दिवसांनी निंदनी करावी लागते .निंदनी झाल्यावर युरिया सारख्या खताचा मारा करावा लागतो व पाणी योग्य वेळी सतत द्यावे लागते तीन चार महिण्यांनी कांदा तयार होतो .तो काढण्यासाठी मजूर लावून प्रत्येक कांद्याला हात लावावा लागतो .कांदा उपटल्यावर तो कट करावा लागतो .सर्व एकत्र करून त्याची घोडी तयार करून ठेवतात किंवा चाळीत भरून ठेवतात हे सर्व करण्यासाठी मजूर किती लागतात याची गणती नाही .प्रत्येक मजूर हा 200 ते 300 च्या दरम्यान दिवसाची मजूरी घेतो.आणी मग शेतकरी जेव्हा कांदा विकायला काढतो तेव्हा मार्कट पर्यंत कांदा नेण्यासाठी परत वाहतूक खर्च आलाच .कांदा 100 रूपये किलोने भावाने गेला तर शेतकर्याची मजूरीही निघत नाही .तो कोलमोडतो .कर्जबाजारी होतो .माल पिकवून सूध्दा त्याचा त्याला उपयोग नाही परंतू व्यापारांचा मात्र फायदा .गावाकडे कांदा शंभर किलोला शंभर रूपये पण शहरात मात्र वीस रूपये किलो .शेतकरी मात्र मरतो पण कधी एकलं का व्यापार्याने आत्महत्या केली. कोण काढील शेतकर्याला ह्या दृष्ट चक्रातून .सरकार बदललं तर अच्छे दिवस येतील असे वाटले होते म्हणून भरघोस मतदान करून सरकार बदलल पण त्याने त्यांचा चांगलाच अपेक्षाभंग केला .कुणी उरला नाही वाली शेतकर्यांसाठी.काय होईल शेतकर्याचं हा येणारा काळच ठरवीन.पण सध्या शेतकरी व शेतीही संकटात आहे व त्यांचा तारणहार कुणी नाही हे च सत्य.बघूया शेतकर्यासाठी कधी चांगले दिवस येतील
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment