लोडशेडिंग
बहूतेक लोकांना हा लोडशेडिंग हा शब्द माहित असेल व त्याचा त्रास बरेच जण सहन करतात .किती वर्षापासून हा त्रास लोक सहन करतात .कुणाला सांगणार व सांगून काहिच उपयोग नाही .तुम्ही कुणालाही निवडून दिले तरी हा त्रास कमी होणार नाही .एक तर गावाकडे पाण्याचा प्रश्न असतो व वरून लोडशेडिंग .उन्हाळ्यात तर गावाकडील लोक नरकाचे जिवन जगतात .एसी तर लांबच असतो पण साधा फॅन चालू करण्यासाठी वीज नाही.नूसता उकाडा जाणवतो कधीही वीज जाते व कधीही येते काहीही भरवसा नाही .गावाकडे लग्न असेल तरीही लोडशेडिंग असतेच तसैच विहिरींना पाणी असते पण विज नसते .मग रात्री अपरात्री शेतकरी शेतात वाट बघतात विजेची .लहान मुले व म्हातारे माणसे आजारी माणसे यांना लोडशेडिंगचा किती त्रास होतोते त्यांनाच माहित.मोठे शहर सोडले तर शहरांच्या एकदम जवळ असलेले गावांना लोडशेडिंग असते .
ज्या दिवशी ही समस्या दूर होईल त्या दिवशी खरं तर भारत सूजलाम सूफलाम होण्याची चिन्हे दिसू लागतील .मोठमोठे प्रकल्प हाती घेण्याआधी लोडशेडिंग हा आजार बरा करण्याचा विचार केला पाहिजे.किती लोकांचा अंत बघणार व याला जबाबदार कोण ?साध्या बेसिक गरजा लोकांच्या भागवल्या जात नाही .लोकांना 24 तास वीज. मूबलक पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी .घरोघरी संडास हे जरी पुरविले तर लोक आपोआप प्रगती करतील .भारत महासत्ता होणार असेल तर ह्या गरजा पहिले पूर्ण करायला हव्यात नाहीतर घरात नाही दाणा मला म्हणे राणा अशी स्थिती होईल . जी स्थिती आहे ती अतिशय वाईट आहे .अजून बरेच वर्ष जातील हे मिळवण्यासाठी व त्यासाठी निस्वार्थी लोकांची गरज आहे. जो तो फक्त आश्वासन देतो पण अजून पाहिजे तसा बदल झालाच नाही .पटत नसेल तर एखाद्या खेडेगावात आठ दिवस रहा मग समजेल मी काय म्हणतो ते.काही ठिकाणी तर टाईमटेबल आहे लोडशेडिंग अमूक दिवशी अमूक वेळेला वीज जाणार तर तमूक दिवशी तमूक वेळेला वीज येणार .सर्वच आश्चर्यकारक आहे व संतापजनक .बघूया वाट ही दूर्दशा दूर होण्याची.
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment