नातीगोती
प्रत्येकाला असतात नातीगोती .काही खरी तर काही खोटी काही फक्त सांगण्यासाठी पण त्यात किती असतो जिव्हाळा .जास्त तर हेवेदावेच असतात .त्याचे कसे चांगले मग माझे का नाही .देवाण घेवाण मूळे नाती निर्माण होतात तर काही कायमचे तुटतात .काही नाती फक्त मरण धारण किंवा लग्न कार्य असते तेव्हाच दिसतात बाकी वेळेस कुणालाच वेळ नसतो ज्यांच्यामध्ये प्रेमाचा ओलावा असतो ते मात्र भेटतात किंवा फोनवरून खुशाली विचारतात .काही मात्र सांगण्यासाठीच असतात की तो माझा अमूक तमूक लागतो .मदतीच्या वेळेस मात्र बरेच नातेवाईक पुढे येत नाही .काही नात्यामध्ये प्रेमापेक्षा फक्त व्यवहार उरलेला असतो .तो व्यवहार नाही झाला की ते नाते आपोआप संपुष्टात येते .सहज विचारपूस करण्यासाठी नाती फोन करत नसतात त्यांचे काही तरी काम अडलेले असते तेव्हाच करतात.ज्यांना फक्त विचारपूस करण्यासाठी फोन येतो किंवा आठवण आली म्हणून फोन येतो तेव्हा मात्र ती नाती खरी असतात .नात्यांमध्ये द्वेषाची भावना भरपूर भरलेली असते .भावांमध्ये" काकांमध्ये 'बहिणीमध्ये' भावाबहिणीमध्ये 'भाचा मामा "पुतण्या काका "मावशी व आई अशा किती तरी जोड्या सांगता येतील की हे एकमेकांशी खरंच प्रेमाने वागतात का .कुरघोडी करण्यातच बरेच लोक आयुष्य वाया घालवतात .गरीब श्रीमंताची दरी नात्यामध्ये आडवी येते .ती दरी सोडली की मग नाते हे नातेच राहते
बर्याच वेळेला रक्ताच्या नात्यापेक्षा बिगर रक्ताचे नाते चांगले असते .त्यांच्यात हेवा नसतो .मदतीला धावून येतात .फक्त जिव्हाळा असतो प्रेमाचा आणिहेच जर खर्या नात्यामध्ये निर्माण झाले तर ते नाते फुलणार व त्याला बहार येणार पण असे नाही होत .काका पुतणे ' मामा भाचा ' भाऊ भाऊ ' बहिणी बहिणी ' सख्ये तसेच चुलतं बर्याच वर्षानी एकमेकांना भेटले व बोलले नाहीत .सर्व नाही पण बर्याच प्रमाणात हे चित्र दिसते .म्हणून बोलतो नातीगोती फक्त सांगण्यासाठी व मरण धारणला लोकांना दाखवण्यासाठी व लग्नांनाही लाजे खातर जमा होतात व त्यातही काहीतरी टिका कारणस्थान करूनच जातात .चांगल अस कुणाला बघायची सवयच नसते.अशा नात्यांचा काय ऊपयोग.फक्त सांगायला माझे नातेवाईक आहेत बरेच .विचार करा खरंच तुमच्याबाबतीत आहे का असं
प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅंलेज मुंबई
Comments
Post a Comment