Skip to main content

मृत्यूचा पाठलाग

मृत्यू करतो पाठलाग

माणूस किंवा कोणताही प्राणी जन्माला आल्यावर त्याच्या पाठीमागे मृत्यू हा पाठलाग करतो .माणूस पुढे पळतो व मृत्यू पाठीमागे .कधी माणूस हरतो तर कधी मृत्यू पण शेवटी मृत्यूचाच विजय होतो.तो कुणाला कोणत्या खिंडीत गाठेल हे सांगता येणार नाही .काहीवेळेस माणूसच मृत्यूच्या पाठीमागे जातो व त्याला आलिंगन देतो .बर्‍याच वेळेला माणसाला माहित नसते की तो मृत्यूकडे जात आहे .काहीवेळेस मृत्यू असा काही बेसावधपणे झडप घालतो की माणूस हतबल होतो.कल्पना करता येणार नाही अशा अवस्थेत तो कुणालाही कुठेही केव्हाही गाठू शकतो.एखाद्या सर्पाच्या तोंडात बेडूक आहे .ते अर्ध सापाच्या तोंडात तर अर्ध बाहेर मग समोर असलेल्या किटकांना त्याला खाण्याचा मोह होतो व त्यासाठी हपापलेला असतो पण त्याला माहीत नाही का की आपण सापाच्या तोंडात आहोत व जे काही खाणार ते शेवटी सापाचेच धन होणार तसचं माणसाचं आहे .माणूस हा काळरूपी किंवा मृत्यूरूपी सापाच्या तोंडात आहे तोाकेव्हा गिळेल सांगता येणार नाही म्हणून जास्त हाव न करता साध नम्रपणे वागावे व जास्तीत जास्त आनंदात राहण्याचा प्रयत्न करावा.आपल्याकडे जी ही काही संपत्ती आहे त्याचा गर्व न करता तिचा आनंदात उपभोग घ्यावा .मृत्यू कुणाला रडवतो तर कुणाला हसवतो .कुणाच्या मृत्यूने कुणाला आनंद होतो तर  कुणाच्या मृत्यूने  पूर्ण परिवार कोलमोडतो.कुणाला मृत्यू वरदान वाटतो तर कुणाला शाप.कुणी त्याची वाट बघतो तर वाट न बघताच तो कुणाला गाठतो.त्याची रूपं वेगवेगळी आहेत.तो कोणत्या रूपात येईल हे कुणालाच सांगता येणार नाही.
        पण तो कुणाला चांगला येतो तर कुणाला वाईट असे का? त्यालाकाहीतरी कारण असलेच पाहिजे. action शिवाय reaction होऊच शकतं नाही.मग ती action अनावधानाने काही वेळा होते ते आपल्याला कळत सुध्दा नाही पण त्याचा परिणाम होतोच. अशा अनेक गोष्टी असतात की चूकून आपल्या हातून एखादी गोष्ट होते पण त्याचा परिणाम भोगावा लागतो .चूकून किंवा मुद्दामहून जमिनित बी पेरले तर   ते उगवतेच.तसचं चूकून कर्म झालं किंवा मुद्दामहून केलं त्याचा सारखाच परिणाम असतो.समजा एखद्याने फार वाईट कामे केलीत व नंतर स्वताहून त्याने जीवन संपवलं तर त्या वाईट कर्मातून त्याची सुटका झाली? मग reaction कुठे गेली .जरी तो ह्या जन्मातून सुटला तरी त्याला पुढच्या जन्मात reaction ला तोंड द्यावेच लागणार मग काही म्हणतील पुन्हा जन्म घेणार यावर विश्वास नाही पण कर्माच्या नियमामध्ये त्याला reaction मिळणारचं .म्हणून प्रत्येक कर्माचे फळ किंवा सजा ही निसर्ग करतोच .व त्या कर्मामुळेच मृत्यू हा पाठलाग करतो सर्वांचा ..एकूणच गूढ आहे सर्व.पण नियतीच्या कचाट्यातून कुणीही सुटलेले नाही .सर्वच अजब आहे .आज हसणारा उद्या हसलेच किंवा उद्या त्यासाठी उजेडलेच असे नाही.मग हा कर्माचा नियम राजा व रंकाना सारखाच  आहे .
     त्यातून सुटका करण्यासाठी संतानी उपाय शोधले .ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षणमात्रे.तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरि.गवताची कितीही मोठी गंजी असेल तर त्याला काडीपेटी लावली तर क्षणार्धात त्याची राख होते तसेच मनापासून हरिचे सतत चिंतन केले तर  त्यातून सुटका होते किंवा ते पेलण्यासाठी शक्ती मिळते.पापे करायचे व नंतर हरिचे नाव घ्यायचे असा संकुचित अर्थ नाही .जसा वाल्याचा नामामूळे वाल्मिकी झाला तसा त्याचा अर्थ. असा अनुभव हा आतून संतानी घेतला व आपल्याला सांगितला तसेच नामाविन मुख सर्पाचे तेबिळ जिव्हा नव्हे काळ सर्प आहेकिंवा ओळखिला हरि धन्य तो संसारी तसेच नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. अशा अनेक अभंगातून त्यांनी मार्ग सांगितला आहे. बघूया प्रयत्न करून तसा विचार करण्याचा.
प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...