Skip to main content

सटकलेली डोके

सटकलेली डोकी
कधी कूणाचं डोकं सटकेल काहीच सांगता येत नाही .सटकलेल्या डोक्याने जो तमाशा तयार होतो त्यामध्ये नुकसानच जास्त होते.कधी बायकोचं डोकं सटकतं तर कधी नवर्‍याचं .सटकायला काही वेळेस क्षूल्लक कारण असते पण पराणाम मात्र जीवावर बेततो.भाजीमध्ये मीठ टाकलं नाही माझ्या आवडीची भाजी केली नाही माझ्याअगोदर जेवण करून घेतले माझ्या घरच्यांशी भांडण केले मुलांना कमी मार्कस मिळाले मुलांकडे लक्ष नाही सतत मोबाईल मध्ये टाईमपास करते माहेरच्या माणसा पलीकडचं तुला काही दिसत नाही .न सांगता कुठे गेली उशिरा का आली.मोबाईल वर कुणाबरोबर बोलत होतीस .त्याचा असा smsका आला.पैसे नूसती उडवते.माझ्या घरच्यांचा मान ठेवत नाहीस.एवढी गबाळी का राहतेस .एवढी फॅशनेबल कशाला राहायला पाहिजे.स्वताचा पैसा खर्च करत नाहीस. खोटे बोलतेस. अशा नाना प्रकारच्या कारणांवरून नवरा बायकोचे डोकं सटकते व काही वेळेस खून मारामार्‍या होतात कोर्टकचेर्‍या होतात व सर्वाचे आयूष्य बरबाद होते .मुलांना नाहक त्यामध्ये ओढले जाते. नवराबायकोच्या भांडणामुळे मुलांना मारहाण केली जाते काहीवेळा त्यांच्या सकट नवरा बायको आत्महत्या करतात.बर्‍याच वेळी पुरूष लेट येतो मित्रमंडळीच्या नादी लागून दारू पिणे घराकडे लक्ष न देणे .घरात पैसे न देणे .बायको पोरांकडे लक्ष नसणे .घरात तुटलेल्या वस्तू वापरणे नको ते कर्ज काढणे घरच्यांचे ऐकून बायकोला मारहाण करणे अशा अनेक गोष्टीमुळे बायकांच डोकं सटकते आणि नको ते पाऊल उचलले जाते .
       काहीवेळा भाऊ बहिण काका मामा आईवडिल यांच्यामध्ये सुध्दा संपती वरून किंवा हेवे दावेवरून डोकं सटकलं जाते व भांडणाचे स्वरूप अक्राळविक्राळ रूप धारण करते ,बर्‍याच वेळा सॅबध कायमचे तुटतात काहिवेळा हाणामारीपर्यंत प्रकरण जाते.खून होतात कोर्टकचेर्‍या होतात.काहीवेळेस नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून नोकरवर्गाचे डोकं सटकते व प्रकरण काहिवेळा हाताबाहेर जाते.काही वेळा नोकरदार मंडळी सांगितलेले काम वेळेवर करत नाहीत म्हणून बाॅसचे डोकं सटकते व तो मग अपमान करत सुटतो त्यावरुन संबंध खराब होतात
     समाजात जे तुरुंगात लोक आहेत त्यांच डोकं सटकल्यानेच ते तेथे आहेत.सटकल्यानंतर जेव्हा मन शांत होते तेव्हा पश्चाताप येतो की माझ्या हातून असं कसं झालं पण वेळ निघून गेलेली असते त्यामुळे जरा शांत विचाराने दुसर्‍याला समजून घेतले व काहीवेळा अपमान आपल्या माणसांचा गिळला तर काही बिघडत नाही.त्यामुळे बरेच अनर्थ थांबतील .दुसर्‍याला किंमत दिल्याने कमीपणा नाही येतं .विचार करा तुमचंही डोकं सटकतं का व अविचाराने तुम्हीही वागलात का? बघा विचार करा व समजून घ्या स्वताला व दुसर्‍याला आणि जमतं का बघा.
प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...