बाप
बाप म्हणजे बाप असतो।
तो कुणाचा तरी लेक असतो।।
बाप म्हणजे बाप असतो ।
तो कुणाचा तरी नवरा असतो।।
बाप म्हणजे बाप असतो।
तो ही कधी दुखा:त असतो।।
बाप म्हणजे बाप असतो।
त्यालाही सुख हवंअसते।।
बाप म्हणजे बाप असतो।
कष्ट करणारा घरगडी नसतो।।
बाप म्हणजे बाप असतो।
तोही भावनेचा भूकेला असतो।।
बाप म्हणजे बाप असतो।
तो घरातला नोकर नसतो।।
बाप म्हणजे बाप असतो।
मुलांच्या ह्रदयाचा ठोका असतो।।
बाप म्हणजे बाप असतो।
घराचा तो मोठा आधारस्तंभ असतो।।
बाप म्हणजे बाप असतो।
सर्वांना पैसे पुरवणारी बॅंक असते।।
बाप म्हणजे बाप असतो।
सर्वांची काळजी घेणारा घराचा डाॅंक्टर असतो।।
बाप म्हणजे बाप असतो।
तो आपल्या बायकोची शक्ती असतो।।
बाप म्हणजे बाप असतो।
तो घराचा प्राण असतो।।
बाप म्हणजे बाप असतो।
तो खराखुरा घरातला देव असतो।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment