आपल्या गुरुजनांवर विनोद पाठविण्यापूर्वी, एकदा खालील कविता वाचून, मग काय ते ठरवा...!*
॥ शिक्षक ॥
*शाळांना जर का शिक्षक*
*लाभला नसता...*
*तर आयुष्याच्या गणिताचा*
*भूगोल झाला असता. ॥ १ ॥*
*फळयावर जर खडूचा*
*हात फिरला नसता*
*तर....अ ब क ड ,बाराखडीचा*
*अर्थ कळला नसता. ॥ २ ॥*
*डोळे भरून येतात जेव्हा*
*हातात पगार येतो.*
*गुरूजी तुम्हीच आकार दिला,*
*जेव्हा मातीचा मी गोळा होतो. ॥ ३ ॥*
*पायथागोरस, आर्किमिडिज,*
*न्यूटनअजूनही तोंडपाठ*
*आहेत गुरूजी.*
*तुम्ही शिकवलेल्या पाण्याच्या*
*रेणुसूत्रात मला तुम्हीच*
*दिसता गुरूजी. ॥ ४ ॥*
*तुमच्या हातून खाल्लेला मार*
*आजपर्यंत विसरलो नाही मी.*
*घोड़ी करुन उभे करायचात*
*तुम्ही आता तीच पद्धत*
*व्यायामाला वापरतो मी. ॥ ५ ॥*
*शाळा चुकवायचो कित्तेकदा*
*उनाडक्या करतांना.*
*पण भीती वाटायची तुमची*
*गृहपाठ तपासतांना. ॥ ६ ॥*
*आज मात्र तुम्ही सोशल साईटवर*
*चेष्टेचा विषय झालात*
*मास्तर कोमात; गुरूजी जोमात.*
*मास्तर पळाला; यात्रेला गेला.* *॥ ७ ॥*
*असल्या कमेंट्स,*
*जेव्हा लोक करतात.*
*काळीज फाटतंय हो गुरूजी*
*आमचे आदर्श रोज मरतात. ॥ ८ ॥*
*तुमची प्रतिमा मात्र माझ्या*
*हृदयात आदरणीयच राहील.*
*मी साक्षर फक्त तुमच्या मुळे झालो.*
*ही जाणीव माझ्या मृत्यूपर्यंत राहील. ॥ ९ ॥*
सर्व गुरुजींना समर्पित...
Comments
Post a Comment