Skip to main content

मुलगा बाप व पैसा

मुलगा ,बाप व पैसा

मुलगा झाला हे ऐकल्यावर आपण स्वता बाप झालोत याची जाणीव होते व त्याला बघण्यासाठी बाप आतूर होतो .सर्वांना पेढे मिठाई वाटतांना स्वता किती अभिमानाने मिरवतो बाप झालो म्हणून पण बापाचे कर्तव्य किती जण पार पाडतात बाप होणे सोपे पण ती जबाब दारी पेलणे फार कठिण याचा अनूभव समस्त बाप मंडळींना आला असणार .मूलाच्या गरजा काहीजण उत्तम रितीने पार पाडतात पण काही सकाळी कामाला निघतात व रात्री येतात मग आपल्या मुलाने दिवसभर काय केले याची साधी विचारपूस नसते .महिने महिने मुलाची व बापाची भेट होत नसते .मुलाचा अभ्यास कसा चालू आहे .त्याच्या शाळेतले शिक्षक कोण आहेत होमवर्क करतो का काही रीमार्कस मिळाले का याची विचारपूस नसते कारण बाप आपल्या कामामध्ये फार गढून गेलेला असतो .मूलाला काही सांगायचे असते पण बापाजवळ वेळ नसतो आईला तो काही सांगु शकत नाही मग तो आपल्या मित्रांजवळ मन मोकळे करतो .घरात काहीही नंतर सांगत नाही .पैसे फेकले की बापाला वाटते आपले कर्तव्य संपले अशा पध्दतीने बाप व मुलगा यांच्यात दरी तयार होते .बाप मग पैसे कमवण्याच्या मागे लागतो भरपूर संपत्ती या ना त्या मार्गाने कमवतो .मुलालाही वाटते आपल्या बापाकडे भरपुर पैसा आहे व तो उडवलाच पाहिजे
         मग मित्रांना पार्टी किंवा पिकनिक सिनेमा महागडे कपडे यांचे त्याला वेड लागते .महागडा मोबाईल त्याला लागतो .माॅलशिवाय पिंचर बघायला आवडत नाही .सायकल चालवणे त्याला कमीपणाचे वाटते. कार किंवा टूविलर असे चालवणे त्याला प्रतिष्ठित वाटते .मोठमोठ्या अपेक्षा उंचावतात त्याचा परिणाम असा होतो की दोन तिन मुले असतील तर त्यांचा बापाच्या संपत्तीकडे डोळा असतो .लग्न होतात मुलांचे मग कोणते घर कुणाला कोणती जमिन कुणाला बॅंक बॅलन्स कुणाला हे ठरवण्याचा अधिकार बापाला कधीच नसतो .ते आपसांत ठरवतात व हमरीतूमरीवर येतात भांडणे मारामार्‍या होतात .बापाकडे बघण्याची भुमिका शिवाय काही उरत नाही .जर बापाने सांगितले की माझी संपत्ती मी कुणालाच देणार नाही तेव्हा त्याला मारायची पण हिंमत करतात .एकएकपै कमावलेला पैसा व त्यासाठी भांडणे तंटे घर फूटणे तूटणे नाते संपवणे मग बापाने यासाठीच एवढे वर्ष घालवलेत व हेच बघण्यासाठी.म्हणून संपत्ती कमवण्याचा विचार करा .मुलांना जाणीव करून द्या की ही माझी संपत्ती आहे तुम्हालास्वता शून्यातून विश्व निर्माण करायचे आहे व मी जे देणार ते सर्वांनी प्रेमाने घ्यायचे आहे .पैसापेक्षा नाते महत्वाचे हे मुलांना वेळोवेळी पटवून द्यायला पाहिजे नाहीतर म्हातारा कधी मरतो व त्याचा पैसा कधी मिळतो असे मुलांना वाटणार पैशासाठी तुमच्या मरणाची वाट बघणार .यापेक्षा मोठा पराभव कोणताही नसेल एका बापासाठी. म्हणून बाप होणे हे फार कठिण असते विचार करा व स्वतासाठीही जगूण बघा कधीतरी .स्वताच्या पैशाने स्वताची हौस कधीतरी भागवा .बायको बरोबर बाहेर पडा .एकमेकांच्या इच्छा पूर्ण करा .थोडा आनंद लूटा म्हणजे पश्चातापाची वेळ येणार नाही जीवनाच्या संध्याकाळी.जीवन जगलो याचे समाधान मिळेल मुलांना स्वताच्या पायावर उभे करा पण अति लाड महागात पडतात याची जाणीव ठेवून त्यांच्याशी व्यवहार करा .बघा जमतं का

प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...