प्रत्येक जण काही ना काही अटी घालत असतो किंवा स्व:ताला घालून घेत असतो अटी.मग काही अटी जाचक असतात त्याचा मनस्ताप होतो तर काही अटीमुळे फायदा होतो.लहानपणापासून अटी माणूस शिकतो .असं केल तर मग तुला मी काहीतरी देईन.मग मुलं शिकतात की काही करायचं असेल तर काहीतरी घ्यावं लागतं किंवा काहीतरी द्यावं लागतं.काहीही न घेता करणे म्हणजे निरर्थक वाटते कारण तसं आपणचं त्यांना शिकवतो मग मोठे झाल्यावर आईबाबांना ब्लॅकमेलींग करतात की हे दिलं तरच मी ते करीन .बर्याच वेळेला हेऐकून फार वाईट वाटतेपण काय करणार मुलेही अनुकरणानेच शिकतात .लग्न झाल्यावर अशा अटी चालूच राहतात तसेच भावा भावात बहिणी बहिणीत नातेवाईक मित्रमंडळी अशा सर्वामध्ये हे चालूच असते तु हे करणार तर मीपण करणार .निस्वार्थीपणे कुणीही कोणतीही गोष्ट करत नाही व जो करत असेल त्याला सलाम.हे जग बहूदा अटींवर चालते .सर्वजण अटी घालतात .सर्वच पाळल्या जातात अशातला भाग नाही .काही जाचक असतात की त्या अटीमुळे माणूस स्वाभिमान गमावून बसतो .चिडचिड करतो .हाणामारी करतो .दंगली होतात .वरिष्ठांचा राग ओढवून घेतो .घरातही कधी सासू अटी घालते तर काहीवेळेला सून अटी घालते.काहीजण स्वताला चांगल्या अटी घालून घेतो त्यामुळे प्रगती दिसू लागते.वाईट गोष्टी करणार नाही अशी स्वतालाच अट
घातली व पूर्ण केली तर फायदाच आहे ना.अटीना पण एक मर्यादा हवी व त्याचा परिणाम चांगला व्हायला हवा.माणूस सुधरायला हवा अटीमुळे .नियम व अटीमध्ये एक धूसर रेषा असते. कुणावर अन्याय होणार नाही याची काळजी अटी घालतांना केली पाहिजे.अटीमुळे माणूस गुलाम बनता कामा नये .दूसर्याला संपवण्यासाठी किंवा ब्लॅकमेलींगसाठी त्रास देण्यासाठी अपमान करण्यासाठी ह्या अटी नसाव्यात .विचार करा व बघा तुम्ही अशा अटी कुणावर घालत तर नाही ना किंवा अशा अटी तुम्ही कुणाच्या सहन करत तर नाहीत ना.
प्रा. दगा देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment