सहनशिलता
सहनशिलता शब्द हा परवडीचा झाला आहे हा गुण असेल तरच माणूस जीवन जगू शकतो पण काहीजण त्याचा गैरफायदा उठवतात .घरात सूनेला बर्याच ठिकाणी बर्याच गोष्टी सहन कराव्या लागतात .टोमणे बरेच मारतात पण माहेरचा पाठिंबा नसल्याने किंवा गरीबी असल्याने तिला सहन करण्या पलीकडे हातात काही नसते .इज्जत तिला प्यारी असते म्हणून किंवा लोक काय म्हणतील ह्या भीतीने नवर्याचा अत्याचार सासूचा सासर्याचा दिराचा हे निमूटपणे सहन करते ती म्हणजे हक्काने मिळालेली नोकरानी असा काहीचा गैरसमज झालेला असतो पण काही ठिकाणी उलटं असतं सून व मुलगा हे सासूला त्रास देण्याचं काम करतात तिला मोलकरनिसारखं वागवतात पण बिचारी जाणार कुठे ती पण सहन करते .बाहेर बसमध्ये ट्रेनमध्ये गर्दित लोक एकमेकांच्या धक्के बुक्के सहन करतात निमूटपणे .कधी पायावर पाय पडतो कधी मोबाईल चोरीला जातो कधी बॅग चोरीला जाते कधी गर्दीमध्ये शर्ट फाटतो हे सर्व संताप करून सहन करावेच लागते .आॅफिस मध्ये लेट झाल्याने किंवा थोडी चूक झाल्याने किंवा काहीही चूक नसताना बाॅसचं ओरडणं सहन करावं लागतं कारण आपल्याला नोकरी हवी असते म्हणून सहन करण्या पलिकडे आपल्या हातात काहीही नसतं .कधी वेळेवर पगार नसतो सहन करा ट्रेन बस वेळेवर नसते सहन करा ट्राॅफिक जॅममूळे वेळेवर पोहचू शकत नाही सहन करा.दुष्काळ पडला पाणी नळाला येत नाही सहन करा .कामवाली बाई वेळेवर आलि नाही सहन करा .वेळोवेळि लोडशेडिंग होते गावात तलाठी रोज येत नाही वायरमन रोज येत नाही सहन करा.अधिकारी जागेवर नसतो आपले कामं रखडलीत त्याला सहन करा .कधी कधी दुखाचा डोंगर कोसळतो मूले वाईट मार्गाला लागतात नवरा दारू पितो हे सर्व बरेच जण सहन करतात म्हणून प्रत्येक ठिकाणी सहन करावे लागते परंतू प्रत्येकाची सहन करण्याची कुवत सारखी नसते .सहनशीलता काहींना नसते म्हणून राडे होतात हाणामारी होतात तमाशे होतात म्हणून मला वाटते शिक्षणामध्ये एक विषय असावा सहनशिलता. तो 100 मार्काचा पेपर with practical असावा आणितो पहिली पासून पोस्टग्रॅज्यूएट पर्यंत असावा .बारावी पर्यंत तो compulsory असावा म्हणजे सहन करण्याची पध्दती त्यातून मार्ग काढण्याचे प्रकार हे लोक शिकतील व पुढील अनर्थ टळतील लोक आत्महत्या करणार नाहीत त्यांची सहनशीलता वाढेल कारण सहन करण्याशिवाय पर्यायच नाही तर मग ते शिकून घ्यावे कसे सहन करावे.प्रत्येक वेळी आक्रमकता उपयोगी नाही पडतं .तसं केल तर कुठे ना कुठे लोक अडवणूकीचं धोरण अवलंबितात.तसेच सहन करायचंच नाही मग काय काय मार्ग अवलंबावेत हे ही त्या विषयात समाविष्ट करावेत.बघा विचार करा व पटतं का?
प्रा. दगा देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment