Skip to main content

कळींचा नारद

कळीचा नारद
आजकाल कळींच्या नारदांची संख्या फार वाढत आहेत.त्यामुळे लोक ऐकमेकांशी बोलायला घाबरतात.आपल्याकडून गोड बोलून घेवून आपल्याविषयी दुसर्‍याच्या मनात कोण कान भरील काहीच सांगता येत नाही एवढचं नाही तर त्याला मीठ मसाला लावून रंगतदार बनवण्यामध्ये अनेक जण माहीर आहेत.कुणावर विश्वास ठेवावा हेच समजत नाही.आपल्याबद्दल दुसर्‍याच्या मनात संशय निर्माण करणे किंवा त्याला भडकावणे हे काहीजण करत असतात म्हणजे त्यांना ती सवयच लागलेली असते.जिकडे तिकडे जासूसगिरी चालू असते.बर्‍याच वेळा आपण बोललो नसलो तरी बाॅसची प्रशंसा करण्यासाठी बाॅसला खोटे सांगितले जाते .बाॅस जर हलक्या कानाचा असेल तर मग आपल्या विषयी त्याचा मोठा गैरसमज झालेला असतो.असे जासूस फार खतरनाक असतात त्यामुळे उगीच संबंधामध्ये कडवटपणा येतो .बर्‍याच वेळा प्रकरण हाताबाहेर जाते.खर्‍या गोष्टीचा प्रचार लवकर होत नाही पण वाईट गोष्टींचा प्रचार फार लवकर होतो .तुम्ही एखादी चांगली गोष्ट केली तर वर्षानूवर्ष लोकांना माहीत पडत नाही पण तुमच्या हातुन वाईट गोष्ट झाली की वार्‍यासारखी लगेच पसरते व तुम्ही कोण कुठले याची पाळेमुळे खणली जातात.कारण खरी गोष्ट जड असते तिला इकडे तिकडे करतानां लोकांना कष्ट पडतात पण वाईट गोष्ट कचर्‍यासारखी हलकी असते म्हणून वार्‍यासारखी ती उडते.ही पसरवण्यासाठी लोकांना विशेष रूची असते.मोठ्या कुटूंबात सुध्दा ह्या जासुसगिरीमुळे कलह निर्माण होतो .कुटूंब तुटतात .लोकांची मने दुभंगतात  व त्यांच्यात दरीानिर्माण होते.अमक्या माणसामध्ये व आपल्यात कोणताही वाद झालेला नसतो तरी तो आपल्याला टाळतो याचा अर्थ कुणितरी त्याचे कान फूंकलेले असतात आपल्याबद्दल व तोही हलक्या कानाचा असल्याने  खरं मानून बसतो.विचार करा तुमच्या बाबतीत असं झालं आहे का ?असेल तर शहानिशा करा मगच विश्वास ठेवा आणि जासूसगिरी तुम्हीही करता का?बघा सोडण्याचं जमतं का ?
प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...