Skip to main content

संकटे

संकटे
प्रत्येकाच्या जीवनात कधी कोणते संकट येईल काहीच सांगता येत नाही.माझ्या जीवनात संकट नाही असा भूतलावर कुणीही नाही.काही संकटावर मात करता येते पण काही संकटे अशी येतात की माणसाला जीवन जगावेसे वाटत नाही.संकटामुळे कधी जीवनाला कलाटणी मिळेल सांगता येत नाही.काहीजण संकटापुढे हतबल होतात आणि म्हणून त्यांच्या जीवनात नैराश्य येते .चालता बोलणारा हट्टाकट्टा माणूस एकदम हार्टअॅटेकने जातो .मागे मागे फिरनारी प्रेमळ मुलगी स्कूटीने काय जाते व अपघात होऊन कायमची सोडून जाते .एकुलता एक मुलगा की ज्यासाठी आईबाबांनी  कष्ट करून सर्व सुख त्याच्या ओंजळीत टाकले व जीवन जगणे फक्त त्याच्यासाठीच आणि अचानक तो आत्महत्या करतो किंवा अपघाताने जातो अशी संकटे काहींच्या नशिबात येतात व ती न संपणारी असतात.अशा वेळेस सावरणे फार अवघड असते.तसेच ज्या नोकरीच्या जीवावर आपण स्वप्न बघतो चांगले जीवन जगण्याचे मुलांना मोठे करण्याचे व अचानक नोकरी जाते अशा वेळेस माणूस हतबल होतो त्याला काय करावे काहीच सूचत नाही फुकट अभ्यांस करून डिग्री मिळवली व त्याच शिक्षणाचा पश्चाताप येतो .चिड निर्माण होते .काहीच आपण करू शकत नाही कुणाविरूध्द असे वाटायला लागते घूसमट होते .सूंदर वाटणारे जग कुरूप दिसू लागते .चेहर्‍यावरचं हसू गायब होते लोक पुतळ्यासारखे वाटू लागतात.बर्‍याच वेळेला आपल्यावर प्रेम करणारी बायको किंवा नवरा अचानक आपल्याला कायमचा सोडून जातो ह्या जगातून तेव्हा ते दु:ख सहन न करण्यापलीकडचं असतं.काहीवेळा अपघातात पाय जातात हात जातात तेव्हा ते परत मिळवणे शक्यचं नसते.अनेक प्रकारचे आजार कधी कुणाला होईल सांगता येत नाही.अगदी विश्वासाची माणसे अविश्वासाने वागू लागतात तेव्हा माणूस कोलमोडतो .अशा नाना प्रकारची संकटे जीवनात येतात .काहींना सहन करता येतात म्हणजेच त्या संकटावर विजय मिळवतात पण बरेच हरतात .सध्याच्या शिक्षण पध्दतीने माणसाला संकटावर मात करणे अवघड जाते.मोठमोठ्या पदव्या घेणारे .मोठ्या पदावर असणारे माणसे सूध्दा संकटापुढे हरतात व आत्महत्येचा मार्ग अवलंबितात मग शिक्षण फक्त पगार मिळवण्यासाठीच का .शिक्षणाने प्रत्येक संकटावर मात करता आली पाहिजे पण हेच आपल्याला शिकवले जात नाही.म्हणून विचार करा व स्वताच्या प्रयत्नाने संकटावर मात करा व विजय मिळवा शेवटी जीवन महत्वाचे असते .मला माहित आहे सल्ला देणे खूप सोपे असते पण ज्यांच्यावर संकटे येतात त्यांनाच माहीत .तरी बघा प्रयत्न करून त्यांच्यावर विजय मिळवण्याचा .मीही प्रयत्न करतो तुम्हीही करा बघू किती जमतं आपल्याला

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...