Skip to main content

टाईमपास

टाईमपास

आपल्या अवतीभवती बघितले तर काहीना वेळ नसतो व काहीजवळ तर वेळच वेळ असतो .वेळ कसा घालवावा याची चिंता असते.सकाळपासून काय करायचं हा प्रश्न असतो त्यांना .मग सकाळ झाली की खेड्यात लोक पारावर किंवा झाडाखाली पार असतो त्याच्यावर जावून बसतात मग याच काय चाललं त्याचं काय चाललं असा टाईमपास करून वेळ घालवतात तरुण मंडळी कोणता तरी विषय काढून रात्री बारा बारा वाजेपर्यंत नुसत्या गप्पा ठोकतात .मग हा का रन आऊट झाला मग त्याने असं खेळायला पाहिजे होते .स्वताला तर काही येत नाही पण उगीचच टाईमपास करायचा.अस वाटायला लागतं की देवाने टाईमपास करायला पाठवलं का .शहरात रिटायर झालेल्यांचा ग्रूप असतो सकाळ झाली मग जमतात सर्व व इकडच्या तिकडच्या गप्पा ठोकायच्या व टाईमपास करायचा .काम काय करायचं हाच तर मोठा प्रश्न आहे.कोणतेही विधायक काम सरकार करेल आपण कशाला करायला पाहिजे .आपण फक्त निवृत्त वेतनाची वाट बघायची व काहीही काम न करता फक्त टाईमपास करायचा.चर्चा करायची फक्त सल्ले द्यायचे आपण मात्र पुढाकार कोणताच घ्यायचा नाही .लोकांना काम करायची इच्छाच नाही राहिली .
सभोवताली जरा चक्कर मारारात्री शहरात काय नी खेड्यात काय तरूण व म्हातारी मंडळी इकडच्या तिकडच्या गप्पा मारतांना दिसतील त्यातून काहीही निष्पन्न होणारे नसते वा भविष्याच्या दृष्टीने कोणतीही योजना नसते .असतो फक्त टाईमपास .टाईमपास करता करता वर्ष  वर्ष निघून जातात मग त्यातलाच जर गेला ह्या जगातून तर मग हळहळ व्यक्त करतात अरे पण तो जेव्हा होता तेव्हा कोणतेही कामधंदा नकरता टाईमपासच करत होता ना पण असला काय नसला काय त्याचं जगणं टाईमपासच होत ना मग कशाला हळहळ पाहिजे.टाईमपासचं रूपांतर चांगल्या विधायक कामामध्ये होत नाही तो पर्यंत देशाची प्रगती होणे शक्य नाही.कामात माणसाने गढून घेतले पाहिजे व त्याचा आपल्या कुटूंबाला समाजाला फायदा झाला पाहिजे.नुसतं बसून फक्त टाईमपास मध्ये जीवन घालवणे म्हणजे जीवंत माणसाचं लक्षण नव्हे .मग किड्या मुंग्यापण टाईमपास करताना दिसतात.छोट्या छौट्या गोष्टीपण करता येतात . प्रत्येकाने विचार केला की पावसाळ्यात आपण मोकळ्या वनात झाडे लावू व त्यांची काळजी घेवू तसेच उन्हाळ्यात पाणी नसते तेव्हा तलाव बंधारा बांधण्याचा प्रयत्न केला तर का होणार नाही .कुणाचंशत्रूत्व असेल तर समेट साठी प्रयत्न करायला हवा अशा अनेक गोष्टीतून बिझी राहता येईल व स्वतालाच आनंद प्राप्त होईल. खेड्यामध्ये काय नी शहरामध्ये काय भावांमध्ये वैर असते काही अपवाद सोडले तर बरेच एकमेकांशी बोलत नाहीत मग टाईमपास करणारी मंडळी त्यांच्यातआग लावतात व जवळ येण्याऐवजी लांब कसे राहतील यासाठी प्रयत्न करतात असले काम न करता त्यांच्यात गोडी निर्माण करा व एकोप्याने कसे राहता येईल यासाठी प्रयत्न करा .बघा तुम्ही पण टाईमपास मध्येच जीवन घालवता का?
प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...