नवीन नोटा
जुन्या पाचशे हजारच्या
नोटांचा केला अंत्यविधी।
जमली त्यासाठी मोठी गर्दी
काहींनी ठेवले देव पाण्यामधी।।
नवीन पाचशेची नोट
म्हणजे नाजूक कळी।
होते तिचे नशिब
माझ्या कपाळी।।
नवीन हजारची नोट म्हणजे
मंडपातील नटलेली नवरी।
दिसायला आहे सुंदर
पण तिला न कुणी वरी।।
जुनी शंभराची नोट
आहे सर्वांचा बाप।
उठून दिसते भरजरी
नाही धरणार कुणी तिचा हात।।
नोटा नोटा करून
झाले सर्व वेडे।
बधिर झाला मेंदू
नाही खावे वाटतं पेढे।।
पैशांच नाही राहीलं
जीवनात मोल काही।
पण त्यांच्याविना मिळत
काहीच नाही।।
पैसा झाला देव
देव झाला पैसा।
कुणी तरी सांगा मला
त्याच्याविना माणूस जगेल कसा।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment