Skip to main content

नैराश्य

नैराश्य

प्रत्येकाच्या जीवनात नैराश्य हे कधीकाळी येतेच त्याचे वेगवेगळे कारणे आहेत.
काहीचे लग्न होत नाहीत
लग्न झाले तर मनासारखा जोडीदार मिळाला नाही
जोडीदार मिळाला पण मुले होत नाहीत
मुले आहेत पण नोकरी नाही
नोकरी आहे पण boss चांगला नाही
काहींना घर स्वताचे नसते
स्वता बद्दल न्यूनगंड तयार होतो
काही जण आजार पणामुळे वैतागले असतात
काहींना व्यसन असते  पण सुटत नाही
काहींचे शेजारी चांगले नसतात
अशा अनेक गोष्टीमुळे माणसाला नैराश्य येते
      आता बर्‍याच वेळा हे नैराश्य आपल्या मनासारखे घडत नाही म्हणून येत असते पण दुसर्‍याच्या मनासारखं घडलं काहीवेळा तर काय झालं असा विचार डोक्यात आला की नैराश्य थोड्या प्रमाणात कमी होते .बर्‍याच वेळा आपल्या negativity मुळे नैराश्य येते तेव्हा थोडा positive विचार केला तर ते कमी होण्यासाठी मदत होईल तसेच माणसाजवळ एखादा छंद असला की नैराश्य दूर होतं म्हणून चांगला छंद जोपासला पाहिजे काहींना गाणे गायला आवडते काहिंना योगा आवडतो काहींना स्वयंपाक चवदार करायला आवडतो काहीना चित्र काढायला आवडते काहींना वाचनाची आवड असते काहींना शंकरा सारखं मौन ध्यानस्थ बसायला आवडते काहींना मित्रमंडळीशी गप्पा मारायला आवडते काहींना नटायला आवडते काहिंना सतत काम करायला आवडते .हे सर्व ज्याला काहीच करायला आवडत नाही त्याला मात्र नैराश्य येते .त्यातून बाहेर पडायला शिकले पाहिजे प्रयत्न करून एकएक समस्या चतूराईने सोडवली पाहिजे कुणीतरी येईल व आपण यातून बाहेर पडू असा विचार न करता स्वता खंबीर बना व मार्ग काढा .मनाला जे आपण विचार पुरवणार तेच आपल्या जीवनात चित्रित होतात .म्हणून चांगला विचार पुरवा .बर्‍याच गोष्टी आपल्या हातात नसतात मग वेळेची वाट बघणं हेच उचित असते शेवटी आपले जीवन महत्वाचं असत .आपण समस्यांना जीवनापेक्षा मोठी मानतो व त्यामूळे ती डोक्यावर गारूड होऊन बसते व नैराश्यला सुरूवात होते .प्रत्येक समस्या जीवनापेक्षा कधीच मोठी नसते आपण तिला मोठी बनवतो म्हणून समस्यापेक्षा आपले जीवन जास्त महत्वाचे असते .तेव्हाच तुकाराम महाराज म्हणतात मन करा रे प्रसन्न सर्व सिध्दिचे कारण.बघा जमतं का

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...