जीवन
जन्म कुठे व कसा घ्यायचा हे आपल्या हातात नाही व तसेच मरण कधी कुठे व कसं हे ही आपल्या हातात नाही मग मधील जेदिवस असतात त्यालाच जीवन म्हणतात व ह्या जीवनात बालपणीचा काळ तर असाच हसत हसत निघून जातो त्या काळात तर खेळण्या व खाण्या व्यतिरिक्त आपण काहीच करत नाही तेवढी अक्कल आलेली नसते .शहाणपणा आलेला नसतो .बरेच वर्ष शिक्षण घेण्यामध्येच जातात .काही वर्ष नोकरी शोधण्यात जातात .मग लग्न करण्यासाठी काही वर्ष जातात .काही वर्ष घर गाडी भावंडे यांना सावरण्यात जातात .काही वर्ष काहींच्या आजारपणात जातात .मग बायको व मुलांच्या मागे बरीच वर्ष जातात .निम्मे आयुष्य तर झोपेतच जाते .काही वर्ष नातेवाईक शेजारी यांच्या भांडणात जाते .काही वर्ष कर्ज फेडण्याच्या चिंतेत जाते .मग मुलांच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी बरेच वर्ष जातात .प्रवासात कितीतरी वर्ष जातात. नवर्याशी किंवा बायकोशी किंवा सासु सासर्याशी जुळवून घेण्यात बरीच वर्ष जातात .
मग सांगा जन्म व मरण यातील दिवसापैकी किती दिवस तुमच्या हातात उरले आहेत फक्त तुमच्यासाठी .असे दिवस खास काढणे शक्य नाही तेव्हा या सार्या दिवसामध्ये स्वतावर कधीतरी प्रेम करा स्वताच्या आवडीचे काही तरी करा .स्वताला कधीतरी चांगले कपडे बुट खाणे पिणे कराथोडा वेळ शांत बसून डोळे मिटा व स्वताकडे बघा.स्वताला आवडेल तेथे फिरायला जा. स्वताच्या आईवडिलांना भेटायला जा त्यांच्याशी गप्पा मारा त्यांच्या सोबत हसाएकत्र जेवण करा त्यांच्या पायांना स्पर्श करा .मित्राबरोबर कधीतरी फेरफटका मारा .पत्नीबरोबर कधीतरी सिनेमा बघा.देवळात जावून देवापुढे भजन मध्ये सहभागी व्हा.किर्तनामध्ये तल्लीन होऊन देवासाठी टाळी वाजा.नाहीतरी म्हणायची वेळ येईल की गेले द्यायचे राहून.समोर गरजवंताचे अश्रू पुसा.यालाच खरे जीवन जगणं म्हणतात.नाहीतर मुलांना सर्वच जन्म देतात वाढवतात व असे करता करता मरून जातात.बघा आवडेल का अस जीवन जगायला?
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment