युनियन बॅंक ते मुंबई बॅक
कन्या सासुराशी जाये।
मागे परतोनी पाहे।।
तैसे झाले माझ्या जीवा।
केव्हा भेटशी केशवा।।
होतो जीव कासाविस तुला सोडून।
झाले सैरभैर आमचे मन।।
येईल तुझी आठवण रोज।
काय करावे सुचतं नाही मज।।
तु दिली आम्हास छान सेवा।
म्हणून आम्ही खात होतो मेवा।।
नवीन आई कशी असेल माहीत नाही।
पण तुझी सर तिला येणार नाही।।
आहेत तुझ्या आठवणी छान फार।
नाही जीवनभर विसरता कधी येणार।।
लागली दृष्ट आपल्या प्रेमाला।
आम्ही सांगू हे दु:ख कुणाला।।
अधून मधून आपण भेटत राहू।
अन सुख दु:खाच्या गोष्टी करत जाऊ।।
आम्ही करतो तुला आज अलविदा।
आठवण ठेवणार आम्ही सदा।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment