सुट्टी संपली पाटी फुटली।
नवीन घ्यायला सवड नाही मिळाली।।
शिक्षक कोण असतील याचं आल टेंशन।
त्यांच्या भितीने झाले अशांत मन।।
आता रोज अभ्यांस करायची सवय पाहिजे।
वर्गात पहिला नंबर येवून व्हायचे वर्गाचे राजे।।
हा क्लास तो क्लास होईल सतत धावपळ।
सर्व कामामध्ये आता होईल पळापळ।।
खेळ खेळ मध्ये यायची भरपूर मजा।
गृहपाठ नाही केला तर आता मिळेल सजा।।
ही परिक्षा ती परीक्षा नुसत्याच परीक्षा।
खेळायला मिळेल याची नाही उरली आशा।।
पालक सांगतील लवकर उठा लवकर झोपा।
वाटतो तसा नियम नाही सोपा।
तो मोबाईल अन टी व्ही होणार आता गायब।
थोडे बघितले तर पालक मारतील बोंब।।
देवाकडे करतो इच्छा।
सुट्टी लवकर येवू दे हीच आमची अपेक्षा।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment