body होण्याच्याआधी
खरं म्हणजे जेव्हा आपण जन्माला येतो की जे आपल्या हातात नसते कुठे जन्माला यायचे तेव्हा आपल्या शरीराला नाव नसते आईवडील आपल्याला नाव देतात व जन्मभर त्याच नावाने आपली ओळख होते. सर्व कागदोपत्री त्याच नावाने ओळखले जातो वास्तवीक ते आपल्या शरीराला दिलेले नाव असते. मग ते नाव जपण्यासाठी आपण काय काय करत असतो त्याला धक्का लागू नये म्हणून जीवनभर आटापिटा करतो. शरीर गेले तरी त्या नावाने लोक लक्षात ठेवतात जयंती पुण्यतिथी त्याच नावाने साजरी करतात पण जेव्हा माणूस मरतो तेव्हा त्याला body हे नाव मिळते त्याची body हलवा तिला तिथे न्या तिला सजवा तिला पुरवा तिला जाळा म्हणजे body ला हे सर्व करा कारण त्यांच्या मताने तो उदा. गणपतराव body पेक्षा अलग आहे व तो तरनिघून गेला व त्याची body राहिली जिला काडीचीही किंमत नाही माती समान तिला किंमत उरली ज्या शरीराच्या जीवावर तो लोकांना लूबाडत होता त्यांना त्रास देत होता कधी नम्रपणाने वागला नाही दुसर्याचे कायमच नुकसान केले स्वताचे कुटुंबासाठी नको ते धंदे केले घरात बाहेर हूकमत गाजवली ऐका शब्दाने प्रेमाने कुणाशी वागला नाही कुणाला मदत केली नाही मीम्हणजे शहाणा बाकी मूर्ख यामध्येच जीवन घालवले त्या शरीराच्या जोरावर व आज तेच शरीर निपचित पडले आहे ते काहीही करु शकत नाही.ज्याच्यावर कुटूंबातील लोक प्रेम करायचे तेच बोलणार बाॅडीला बाहेर काढा व लवकर तिला जाळा .ज्याच्यांवर मदतीचा वर्षाव केला होता तेच तुम्हाला नेणार व तुमच्या बाॅडीची विल्येवाट लावणार म्हणजे बाॅडीला काहीही किंमत उरली नाही.
जो पर्यंत ते body नव्हते तो पर्यंत मान अपमान यामध्येच त्याला अडकवले व लोकांना अपमानित करणे बाॅसगीरी दाखवणे वाईट बोलणे यामध्येच सर्व जीवन घालवले पण आज body झाल्यामूळे काहीही करता येत नाही म्हणून सांगतो body होण्या अगोदर सावध व्हा व तुमचे सर्व स्वप्न पूर्ण करा हसा खेळा नाचा खा दुसर्यांना हसवा नको तेवढा संचय करू नका पैशांचा वापर स्वतासाठी कुटूंबासाठी समाजासाठी करा बॅंकेत लाखो रूपये नूसते पडून राहणार स्वता काटकसर करणार कोणत्या हौसमौज न करता फक्त बचत करणार आहे त्याचा वापर करा कारण तुम्ही कधी body बनणार हे तुम्हालाही कळणार नाही काळ सर्वांच्या पाठीमागे लागला आहे केव्हा झडप घालणार ते कुणालाही कळणार नाही म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद लूटा सोडा तो मान अपमान सर्वांशी प्रेमाने बोला हसून स्वागत करा .लहान मुलांमध्ये त्यांच्यासारखे बना .आपल्याला आलेले काम प्रामाणिक पणाने करा व आनंदाने करा .व्यसन लावून आपल्याला body लवकर बनवू नका
आता ह्या क्षणापासून सावध व्हा व जीवनाचा आनंद लूटा योग्य मार्गाने बघा प्रयत्न करून जमतं का ते पण body होण्याआधी.positive प्रत्येक गोष्टीमध्ये शोधा व प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगला गुण असतो तो बघा व कायम आनंदीत रहा. मनाला कायम चांगले विचार पुरवा कारण विचार हे मनाचे खाद्य असते .जसे विचार तसे आपल्याकडून कृती घडत असते .बघूया प्रयत्न करून
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment