EMI n progress
आजकाल बघितले तर हा शब्द emi परवडीचा झाला आहे.एखाद्या मोठ्या दुकानात गेलो सहज फिरायला व एखादी वस्तू आवडली तर मग तेथे सांगितले जाते 10% च भरा व बाकीचे emi वर होऊन जाईल मग माणूस मागचा पुढचा विचार न करता ती वस्तू घेवून टाकतो मग त्यामध्ये फ्रिज टी व्ही फर्निचर वाॅशिंग मशिन तसेच अनेक घरातील उपयोगी वस्तु असतात .emi च्या नादी लागून घर वस्तुंनी भरलं जातं पण मग emi च झंझट दर महिन्याला पाठीमागे लागतं व वस्तुच्या किंमतीपेक्षा जास्त पैसा द्यावा लागतो.सामान्य माणूस असाच विचार करणार की एकदम पैसा भरण्यापेक्षा दर महिण्याला थोडा थोडा गेला तर काय बिघडतं .चांगली गोष्ट आहे एकदम पैसा नसताना तुम्ही तुम्हाला आवडलेली वस्तु आणू शकता.तसेच घर घेण्यासाठी सामान्य लोकांकडे एवढे पैसे कुठून असणार मग emi शिवाय पर्यायच नसतो.पैसे नसताना emi च्या जोरावर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता.म्हणून emi व सामान्य माणूस यांचा फार जवळचा संबंध आहे .emi म्हणजे त्यांचा मित्रच म्हणावे लागेल.घर घेतले किंवा कोणती वस्तू घेतली ती कशावर घेतली हे कुणी विचारत नाही .घेतली ते महत्वाचे .सामान्य माणूस emi शिवाय प्रगती करूच शकत नाही व स्वप्न साकार करू शकत नाही पण मोठा emi असला तेव्हा दर महिन्याला जी कटिंग होते ते बघून फार वाइट वाटते .तेव्हा वाटायला लागते की ह्या em मधून कधी सुटका होईल व ज्या दिवशी सुटका होते तेव्हा एका प्रचंड आर्थिक मंदीतून सुटका झाल्यासारखे वाटते.मग काही दिवस पूर्ण पगार घ्यायला आनंद वाटतो पण परत emi चे डोहाळे सूरू होतात व ते चक्र परत चालू होते.काहीजण भिशीच्या मार्फत पैसे गोळा करतात व ज्याला गरज आहे त्याला एकदम पैशांची मदत होते आणि हा चांगला उपक्रम आहे पण काहीवेळा त्यात भानगडी होतात व चांगला उपक्रम बंद होतो .काहीजण दर महिण्याला फिक्स amount भरतात व वर्षाशेवटी त्याचा उपयोग होतो मोठमोठ्या कंपण्या सूध्दा कर्ज काढून emi भरतात सरकार सुध्दा दुसर्या देशाकडून कर्ज काढून emi भरत असते म्हणजे पूर्ण जगचं emi च्या चा आधार घेवून प्रगती करते.ज्याला जसे फायदेशीर वाटते ते त्याने करावे पण शांततेच्या मार्गाने.विचार करा तुम्हीही वरील कोणता तरी मार्ग अवलंबित असणार व ते तुम्हाला चांगल्या प्रकारे जमतं का बघा.
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment