Skip to main content

मनातले GPRS

आपल्याला कुठे जायचं असेल तर लगेच आपण gprs सुरू करतो व कुणाला न विचारता इच्छित स्थळी आपण पोहोचतो त्यामुळे मोठे टेंशन कमी झाले नवीन जागा शोधायची.त्यासाठी मोबाईल मध्ये नेट व बॅटरी चार्ज असली पाहिजे मग वाटेल तेथे पोहोचता येते .एकदा ती जागा माहित झाली की मग पुन्हा जायचं असेल तर gprs लावायची गरज नसते ते आपल्या मनात तयार होते .त्या जागी पुन्हा जायचं असेल तर मनात आपोआप  map तयार होतो तसेच रस्ते वळणे सिग्नल सर्व खाणाखूणा आपोआप मनात तयार होते व त्यानुसार आपण आपली गाडी हाकत असतो आणि इच्छित स्थळी पोहोचतो .यालाच मनातले gprs  म्हणतात .ह्या मनातल्या gprs मुळे सर्व गोष्टी आठवायला लागतात मग त्या सुखाच्या असोत की दु;खाच्या.लहाणपणापासूनच्या गोष्टी ह्या gprs मुळे आठवतात व संपूर्ण जीवनात घडलेल्या गोष्टीचा map तयार होतोआणि त्या map नुसार सर्व गोष्टीचं वर्णन आपण हुबेहूब करतो.ह्या मनातल्या gprs मुळे आपण बर्‍याच गोष्टी शिकतोव त्याचा उपयोग भविष्यात होतो म्हणून मनात कोणते gprs निर्माण करायचं ते बर्‍याच वेळेला आपल्या हातात असते सहसा मनातले gprs पुसता येत नाही मरेपर्यंत ते आपल्या बरोबर असते.मन चालू केले तर ते सुरू होते व बर्‍याच वेळेला बंदच होत नाही.मग आठवा तुमचं gprs कसं आहे व अजून चांगले बनण्याचा प्रयत्न करू या .बघा जमतं का

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...