GST
gst चा आहे सर्विकडे गाजावाजा
दुकानांमध्ये विक्रीचे आले उधाण।
जिकडे बघावी तिकडे गर्दीच गर्दी
लोक धावत सुटले सोडून मकान।।
काहीचा होणार भाव कमी
तर काहीचा होणार जादा।
काहीही झाले कमी जास्त
तरी सरकारचा होणार फायदा।।
सरकार खेळते चांगली चाल
पेट्रोल डिझेल नाही त्यात।
कुणीच विचारला नाही सवाल
कारण खूपच फायदा आहे त्यात।।
एकच करप्रणाली आहे चांगली
सरकारची भरेल चांगली गंगाजळ।
करावा विचार विकासाचा सरकाने
नाहीतर जनतेची होईल जळफळ।।
गरीबांचा केलेला आहे विचार
त्यांच्या राहणीमानात नाही फरक पडणार।
असणार ते जिथे आहेत तिथे
कारण त्यांच्या गरजा नसतात फार।।
श्रीमंतांना लागणार बरीच कात्री
येतील तेही लवकरचं जमिनीवर।
पण शोधणार त्याच्यातही मार्ग
अन भार पडणार सर्वसामान्यांवर।।
लवकरच कळेल gst चे फायदे तोटे
जनताच देईल सरकारला उत्तर।
खुश झाली सारी जनता
तर निवडून देईल पुन्हा हे सरकार।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment