आपला remote आपल्याजवळ
आज जर बघितले आपण तरअसे दिसते की आपला रिमोट आपल्याजवळ नाही आपण फक्त स्र्किन आहोत व आपला रिमोट दुसर्याच्या हातात आहे .पाहिजे तेव्हा तो बटन दाबतो .बटन दाबले की आपण हसतो .रडण्याचे बटन दाबले की आपण रडतो .बटन दाबले की आपण गप्प होतो म्हणजे तो आपल्याला पाहिजे तसा खेळवू शकतो आपल्या भाव भावना त्याच्या हातात असतात .आपल्या जवळ काहीच नाही .म्हणून आपण पाहिजे ते करू शकत नाही .पाहिजे तेव्हा हसू शकत नाही रडू शकत नाही मजा मारू शकत नाही.कुणीही यावे व आपले बटन दाबून जावे आणि हवे तसे आपल्याला नाचवावे.आपला रिमोट आपल्याजवळ नसल्याने आपण नको ते करून बसतो .आज जे लोक तुरूंगात आहेत त्याचे कारण त्यांचा रिमोट कुणीतरी दाबला व त्यांना भावना कंट्रोल न झाल्यामुळे ते वाईट कृत्य करून बसलेत म्हणून सांगतो आपला रिमोट कुणाजवळ देवू नका .आपला आपल्याजवळच ठेवा म्हणजे कोणती गोष्ट करायची किंवा नाही ते स्वता तुम्ही ठरवणार .सारासार विचार करूनच निर्णय घ्याल व पुढचे संकट टळेल .स्वतावरचा ताबा सुटणार नाही व अनर्थ टळेल .नाहीतर रस्त्यावरचा माणूसही बटन दाबून तुम्हाला उचकावण्याचा प्रयत्न करील व रागाच्या भरात नको ते पाऊल उचलणार
छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुध्दा लोक तुमचं बटन दाबून distrub करू शकतात व जीवन संपवू शकतात .म्हणून स्वताचा रिमोट स्वताजवळ ठेवा व आपले जीवन सुखमय करा आनंदी करा घरापासून ते आॅफिसपर्यंत सर्व लोक तुमचे बटनं दाबायला तयार आहेत तर स्वताला सांभाळा व सुखी व्हा व कुटूंबाला सुखी करा बघा जमतं का
प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई
Comments
Post a Comment