Root canal
जेव्हा दाताचे दुखणे चालू होते तेव्हा डाॅक्टर दाताचे रूट कॅनल करतात म्हणजे दाताचं कनेक्शन तोडतात मग हवंते दातावर उपचार करतात .कनेक्शन तोडल्यामूळे मेंदूपर्यंत संवेदना जात नाहीत त्यामुळे त्रास होत नाही मग डाॅक्टर त्या दाताला हवं तो shape देतात सिंमेंट भरतात .कनेक्शन तोडल्यामुळे त्रास होण्याचा संबंधच येत नाही
तसं नात्याचं रूट कॅनल करता आलं तर किती बरं होईल कारण नात्यामध्ये कनेक्शन असल्यामुळे ते जर आपल्या मनाविरूध्द वागले तर फार त्रास होतो .वेडवाकडे शब्द आले तर मन दुखावली जातात संबंध दुरावतात .जीवन disturb होते कारण नात्याकडून अपेक्षा आपण ठेवतो व पूर्ण नाही झाल्या तर मग चिडचिड मनस्ताप होतो कारण कनेक्शन मुळे होते सर्व पण जर नात्याचं रूट कॅनल करता आलं तर मग त्रास होणार नाही मग कसेही वागले तर आपल्याला त्रास होणार नाही पण नात्याचं रूट कॅनल करणे तेवढे सोपे नाही व अशक्यही नाही व झालेच तर माणूस सुखी होईल .जी सारी दु:ख येतात ती बंधनामुळे व ते बधनच जर तोडले तर मग कुणी कसैही वागले फरक पडणार नाही तसेच वाईट मित्र खडूस शेजारी यांच्यामुळेही खूप त्रास होतो .यांचेही रूट कॅनल केले तर मग मात्र त्या त्रासापासून सुटका होईल .म्हणून सांगतो ज्या ज्या गोष्टीमुळे त्रासहोतो त्यांचे रूट कॅनल करा व तसे जमत नसेल तर आपल्या मनातील विचारांचे रूट कॅनल करा .आपल्याला हवं असेल तसचं दुसर्याने वागले पाहिजे ह्या विचारांचे रूट कॅनल करा मग आपल्याला त्रास होणार नाही.बघा जमतं का
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment