पोळा
आला रे आला बैलांचा सण पोळा।
आज पुरणपोळ्यां करायला वळा।।
वर्षभर न थकता बैल करतो काम।
अन मालक कमवतो वर्षभर दाम।।
कधी खातो कोरडा चारा तर कधी ओला।
कधी खातो मार बिचारा बैल भोळा।।
त्याला झोप वगैरे माहीत नसते।
मालक जसं सांगेल तसं त्याला करायचं असते।।
बैल असतो मालकाचा कायम गुलाम।
पावसाळ्यात काम करून थकतो जाम।।
शेतकरी बैलाला नको त्या शिव्या देतात।
मौन धारण करून बिचारे ऐकत असतात।।
काही वेळा मालकापेक्षा बुध्दी असते बैलाला।
फूटक त्याचं नशिब तो बैल म्हणून जन्मला।।
पाऊस पडतो तो जनावरांसाठी।
काळजी वाहतो देव त्यांच्यासाठी।।
आयूष्य वाहतो बैल शेतकर्यांना।
म्हातार्या बैलाला शेतकरी विकतो कसायांना।।
बैल हाच शेतकर्यांचा खरा देव।
घ्या त्याचे देवासारखे नाव।।
प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई
Comments
Post a Comment