निरोप
प्रशिक्षण देताना आली आम्हाला मजा।
सांगा ना तुम्हाला नाही ना झाली सजा।।
सांगा आम्हाला ,कसं वाटल प्रशिक्षण तुम्हाला।
त्रुटी सांगितली तर राग नाही येणार आम्हाला।।
ब्लू प्रिंट आहे पेपर पॅटर्नचा प्राण।
कळण्यासाठी एकाग्र करावे लागेल मन।।
महत्व द्या अॅप्लिकेशन अन स्किल ला।
नाॅलेज अन अंडरस्टॅडिंग धावत येतील मदतीला।।
घेऊन नका जाऊ मनातील काही शंका।
नाहीतर पुढे problem होईल बाका।।
सुरू करा आता तुमचे जोमाने काम।
नाहीतर पुढे होईल कामाची ट्रॅफिक जाम।।
नाॅलेज अंडरस्टॅडिंग येतात आमच्या स्वप्नात।
ते अॅप्लिकेशन स्किलला सारखे येऊन भेटतात।।
प्रशिक्षण संपून झाली आमची सुटका।
नाही विश्रांती घेतली थोडीशी घटका।।
आज लागेल आम्हाला शांत झोप।
भरपूर केले आम्ही म्हणून होणार नाही कुणाचा कोप।।
प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई
Comments
Post a Comment