Skip to main content

शांती

शांतताभंग
प्रत्येक माणसाच्या जीवनात हा शांतताभंग येत असतोच .घरातील शांतता निघून जाते व मनातील ही.अशा काही घटना घडतात की कुणीतरी आपली मनशांती हिरावून नेतो त्याला कारण आपणचं असतोच आपलं मन एवढं कमजोर असतं की कुणीही यावं व आपली शांती भंग करून जावी.दैनंदिन  जीवनात प्रवास करताना तसेच कामाच्या ठिकाणी  आपल्या घरात अशा व्यक्ती असतात की ते आपली शांतता भंग करतात व आपणही त्यांच्या नादी लागून स्वताचे मन विचलित करून बसतो व शांती हरवून बसवतो.शांती भंग करण्यासाठी मोठी घटना घडली पाहिजे असे नाही तर छोट्या गोष्टींमुळेही आपण मनशांती हिरावून बसतो .एकदा मनशांती गेली तर मग काहीही मनासारखं होत नाही व कोणतेही काम व्यवस्थित होत नाही.काश्मिर मध्ये जरी गेलात व मन शांत नसेल तर मग त्या काश्मिरचाही उपयोग नाही त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल शांती भंग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.समजा मनशांती गेली तर काळ हा त्यावर औषध आहे .जोपर्यंत मनाची अशांती आहे तोपर्यंत जास्त कुणाशी न बोललेलचं बरे .मौन धारण करणं चांगल किंवा विश्वासू व्यक्तिजवळ मन मोकळे करावे त्यामुळे मनावरचा ताण कमी होतो व मन शांत होण्यासाठी मदत होते.सर्वांत मोठी आपत्ती म्हणजे आपली मनशांती ढळणे.मनाला असं कणखरं बनवलं पाहिजे की कुणीही आपली शांती हिरावून आपल्या परवानगी शिवाय घेवू शकणार नाही.सर्व बटनं आपल्या हातात असले पाहिजे.नाहीतर जागोजागी बरेच उभे आहेत आपल्याला disturb करण्यासाठी .लोकांवर विजय सहज मिळवता येतो पण स्वतावर मिळवणे फार अवघड म्हणून जेव्हा आपली मनशांती जाते तेव्हा लोकांना दोष देण्यापेक्षा स्वतालाच द्यावेत कारण स्वता कमजोर असल्यानेच कुणीतरी येतो आणि शांतीला पळवून नेतो.जेव्हा शांती जाते तेव्हा तिचे शत्रू मनात तसेच घरात प्रवेश करतात .शांती जाताच मग राग हळूच येतो रागाच्या पाठीमागून द्वेष येतो लोभ येतो मग अशांती येते आणि हे सर्वजण आलेत की मग बरबादीला सूरूवात होते म्हणून शांती हा पाहूणा आहे व त्याला कधीच जावू देवू नका.शांती जर आपला सखा झाला मग म्हणावेसे वाटेल की क्या कहूॅ और कहने को क्या रह गया.बघा जमतं का  हे सर्व

प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...