Skip to main content

शिक्षण व नोकरी

शिक्षण व नोकरी
शिकत असताना आपल्याला वाटते की शिक्षण झाल्यावर नोकरी मिळाली पाहिजे पण सर्वांच्या बाबतीत असे होत नाही .काही बरेच शिकलेले आहेत पण नोकरी लागत नसल्याने दुसरा काही तरी कामधंदा पकडला वास्तविक शिक्षणाचा व त्या कामाचा काहीच संबंध नसतो पण पोटाची खळगी भरण्यासाठी तसे नाईलाजाने करावे लागते .काही वर्षापूर्वी डिएड ची लाट आली होती .डिएड झालं की नोकरी हमखास लागते म्हणून अनेक हूशार विद्यार्थि त्याकडे वळले व मास्तरची नोकरी पदरात पाडून घेतली .गावाकडे बर्‍याच वेळि नोकरी करायची व शेतीही करायची असे सूरू झाले आता शाळेकडे जास्त लक्ष असते की शेतीकडे हे त्या शिक्षकांनाच माहित व विद्यार्थ्यांना माहित पण विद्यार्थ्यांच्या प्रगतीची चर्चापेक्षा शेतीची पगाराची अधिकारी वर्गाचीच जास्त चर्चा ऐकायला मिळते तसेच बदलीची चर्चाही बर्‍याच वेळा ऐकायला मिळते.नोकरदार मंडळीही गावात घर बांधण्यापेक्षा तालूका किंवा जिल्हा या ठिकाणी घर घेतात व तेथेच स्थायिक होतात व पाहूण्यांसारखे गावाला कधीतरी फेरी मारतात साहजिकच आहे त्यांचा पण नाईलाज असतो पण ही वस्तूस्थिती आहे.ज्यांना नोकरी नाही मिळाली ते शेती करतात नाहीतर एखादा धंदा करतात.पण प्रत्येक जण आपण किती वरचढ आहोत हेच दाखवण्याचा प्रयत्न कलत असतो.एक भाऊ शेती करतो व एक नोकरी करतो तरी शेती वाल्याला नोकरी करणार्‍याचे आकर्षण असते .शेतीमध्ये लाखो रूपये मिळाले तरी कायम रडत असतो .मी तुझ्यापेक्षा खूप सूखी आहे असं कधीच बोलत नसतो .नोकरदार मंडळीही सर्व गोष्टी बाजारातून आणत असतात त्यामुळे त्यांनाही वाटते की पैसा पूरत नाही .अशा पध्दतीने सर्वांच्या रडगाथा चालू असतात .म्हणून ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी सुखी आहोत असं मनाला पटवा व रडगाणे बंद केले तर आपण नक्कीच सुखी होऊ. बर्‍याच वेळेला हेवेदावे करण्यातच आपला वेळ आपण फुकट घालवतो. ह्या हेवेदाव्यांमुळे नाते संबंधात बाधा येण्याला सुरूवात होते .एकूणच सर्व कठिण आहे .बघा सारासार विचार करून मध्य साधता येतो का?

प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...