Skip to main content

गणपती

गणपती
दोन दिवसावर गणपती येणार आहेत त्यामुळे सर्वजण आनंदात आहेत .काही गावाकडे जायला निघालेत तर काही मुंबई तसेच पुणे येथे जाण्याचा विचार करता आहेत. देव हा सर्वकडे सारखाच असतो पण त्याला विराट रूप दिले व लाखोंची सजावट केली तरच तो तेथे असतो असे नाही .मला अजून कळले नाही की लालबागचा गणपती पावणारा व बाकीचे नाही असे काहीही नसते .तरी लोक तासनतास रांगेमध्ये उभे राहून दर्शन घेतात.त्यांनी श्रध्येपोटी जरूर दर्शन घ्यावे पण बाकीचे गणपती पेक्षा हा गणपती श्रेष्ठ अस समजू नये व लाखोची देणगी त्या पेटीमध्ये टाकतात ते मोजायलाच आठ दहा दिवस लागतात. तू पैसे किंवा सोने टाकले तरच तो प्रसन्न होईल असे काही नाही .एवढाच पैसा असेल तर वृध्दाश्रम अनाथालय गरिब मुलांचा शाळेचा खर्च अशासाठी उपयोग करा.तस केल तर त्या लोकांमध्ये असणारा देव प्रसन्न होईल व तुम्हाला आशिर्वाद मिळतील.तसेच गणपतीच्या नावाखाली पत्ते खेळणे दारू पिऊन नाचणे व सिनेमाचे वात्रट गाणे लावणे व धिंगाणा घालणे हे तर वाईटच.मोठे मोठे ढोल आणणे व जीव तोडून वाजवणे आणि लहान मुले व म्हातारी माणसे तसेच आजारी लोक यांना आवाजाचा किती त्रास होत असेल याचा अजिबात विचार नसतो .देवा वर प्रेम दाखवण्यासाठी दुसर्‍याला त्रास होईल असे का करावे? गणपती म्हणजे काय सर्वाना परवाना मिळालेला असतो काय ? कितीही ध्वनी प्रदुषण करा .देणग्या गोळा करा .नाचा  गोंगाट करा.सण साजरे करा पण टिळकांना अपेक्षित काय होते ते सर्व बाजूला पडून धंदा झाला आहे.गणपतीच्या नावाने अनेक लोकांना कामे मिळाली लाखोंची उलाढाल होते लोकांना आनंद मिळतो हे सर्व चांगले आहे पण त्याचे नाव पुढे करूण जी स्पर्धा चालली आहे ते वाइट .आमचा गणपती श्रेष्ठ की तुझा यासाठी लाखो रूपये खर्च करूननको ते प्रदर्शन मांडणे हे वाईटचं. लोकांमध्ये विविध वाईट रूढीबद्दल जागृती निर्माण व्हायला हवी .लोकांनी एकत्र यायला पाहिजे .विचारांची देवाण घेवाण झाली पाहिजे.देवाबद्दल प्रेम श्रध्दा निर्माण झाली पाहिजे .पैशाचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी झाला पाहिजे.भजन किर्तन झाले पाहिजे .वाविध उपक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे.वातावरण उल्हासि असले पाहिजे.देव हा सर्विकडे सारखाच असतो .अमूक पावणारा व तमूक पावणारा अशी अंधश्रध्दा दूर केली पाहिजे.व्ससनापासून मुक्ती कशी मिळेल असे कार्यक्रम दाखवले गेले पाहिजे.गणपतीच्या सणामुळे लोकांच्या मनात चांगला बदल घडवून आणला पाहाजे नाहीतर बेरोजगार लोकांना चरण्यासाठी गणपती सण हा कुरण व्हायला नको. तसेच दहा दिवस गणपतीची पुजा करतात व विसर्जन करताना मोठे गणपती ट्रकमध्ये ठेवतात आणि समुद्रामध्ये किंवा खाडीमध्ये  वरून ढकलतात .जणू असं सांगतात की  तुमचा व आमचा संबंध संपला .काही दिवसांनी समुद्राला ओहौटी आल्यावर मग गणपतीचे मुंडकं वेगळे पाय तुटलेले हात तुटलेले  असे चित्र बघायला मिळते .ते बघून फार वाईट वाटते .गणपती साठी काहीजण जेवढे खर्च करतात त्यापेक्षा कैकपटीने त्याच्या नावावर कमवतात .एवढीच भक्ती असेल तर स्वता खर्च करा व दानपेटी ठेवू नका आणि हार व नारळ व्यतिरिक्त लोकांना आव्हान करा की पैसे किंवा सोने काहीही देऊ नका पण असं कुणीच करत नाही सर्व गणपतीच्या नावावर नफा कमवायला बसलेत मग भक्ती कुठून आली .एकूणच सर्व विचित्र आहे . काही मात्र खरंच काहीही न घेता गणपतीच्या नावाने सेवा करतात असे लोक खरच ग्रेट आहेत व तेच गणपतीचे खरे भक्त व अशांनाच गणपती पावेल .बघा तुम्हाला पटतात का विचार व करायला जमतं का बघा

प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...