पूर्वीचे बाबा व आताचे
पुर्वी गुरूकूल पध्दती होती म्हणून पालक विश्वासाने आपल्या पाल्यांना त्या आश्रमात पाठवायचे .अनेक वर्ष शिकून मुले घरी यायचे व पुढील मार्ग गुरूंच्या मार्गदर्शनाने पुढील आयूष्य जगायचे.गुरू म्हणजे त्यांच्या दृष्टीने सर्वस्व.गुरूंसाठी पूर्ण आयूष्य ही देण्यासाठी तयार व्हायचे आणि गुरू आपल्या शिष्याला सर्वांतम बनवायचे .रामकृष्ण परमहंस यांनि विवेकानंदाच्या आयूष्याचे सोने केले व ती जोडी अजरामर झाली .सुदामा व कृष्ण गुरूंच्या आश्रमात राहून अनेक विद्या शिकले. राम व लक्ष्मण ही विश्वामित्रांच्या सानिध्यांत अनेक विद्या शिकले.त्यावेळी गुरूवर पालकांचा अतिशय विश्वास व गुरू ही तो विश्वास सार्थक ठरवायचे.म्हणून आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते.चारित्र हा सर्वश्रेष्ठ गुण गुरूंजवळ असायचा .सितेची सेवा वाल्मिकींनी मुलिप्रमाणे केली.गुरूचे राहणे अतिशय साधे होते .कुटीर, अंगावर साधे कपडे साधे खाणे .साधी राहणी व उच्च विचार.देशाला महान बनवण्याची ताकद होती त्यांच्यात.चाणक्य सारख्या गुरूंनी वाईट प्रवृती ठेचून काढल्या व चंद्रगुप्त मौर्य सारख्या सामान्य व्यक्तीला असं घडवले की त्याला सम्राट बनवले.देशाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले त्यानंतर अनेक महान गुरू लाभले व भारत देश अध्यात्म मध्ये अग्रेसर बनला.देशोदेशीचे विद्यार्थि शिकायला भारतात येत असत .ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ रामदास कबीर मिराबाई ह्या लोकांनी लोकांना साध्या भाषेत तत्वज्ञान सांगून समाजाला सूसंकृत बनवले व आदर्श निर्माण केला .आजही त्यांनी सांगितलेल्या मार्गावर लोक चालतात .साईबाबा स्वामी समर्थ गजानन महाराज हे लोक अत्यंत साधे जीवन जगले पण आपल्या विचाराने व आचाराने समाजाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले व ते गेल्यावर सुध्दा त्यांचे विचार हे दिपस्तंभ ठरतात व त्यांना आदर्श मानतात .पण आता चित्र बदलले
आज चॅनल चालू केला की बाबा गुरू लोकांचे प्रवचन दिसते व हे लोक एकदम हायटेक .मोठमोठ्या करोडो रूपयांच्या गाड्यामध्ये फिरतात .राहायला आलिशान जागा असते त्यात सर्व सुविधा. साधे जेवण नसते .अत्यंत उच्च प्रतिचे जेवण .बरेच बाबा विमानाने प्रवास करतात.त्यांची सेवा करण्यासाठी अनेक सेवक असतात .त्यांना संरक्षण दिले जाते .सर्व मंत्री त्यांचे आशिर्वाद घेण्यासाठी जातात. लोक ही बाबांचा हा थाटमाट पाहून त्यांच्यामागे वेडे होतात व वाहात जातात.आपली आयूष्यांची पुंजी बाबांच्या नादी लागून खर्च करतात आणि हे बाबा लोकांचा विश्वासघात करतात. करोडो भक्त असतात बाबांना देवाचे स्थान देतात व बाबा लोक साधा विचार करत नाही .मग त्यांना गुर्मि चढते व आपणच भगवान आहोत असे त्यांना वाटायला लागते व त्यांचा पाय घसरतो व नक ते धंदे त्यांचे चालू होतात आणि आपल्याला कुणी काहिच करू शकणार नाही असा गैरसमज त्यांना होतो पण शंभर पाप भरले की मग त्यांची अधोगती चालू होते .करोडो लोकांचा विश्वासघात करतात .आणि म्हणूनच बाबा लोकांवर आता विश्वासच उरला नाही.एखादा चांगला असेल तरी लोक विश्वास ठेवणार नाहीत.चांगल्यावरचाही लोकांचा विश्वास उडाला व हे समाजाच्या दृष्टीने फार वाईट आहे एकतर आताची पिढी देव वगैरे मानत नाही व वरून बाबा लोकांचे धंदे तेव्हा अजूनच तरूण पिढीला चेव फुटतो.समाज रसातळाला जाण्याचे चिन्ह आहे हे.हा विश्वास निर्माण करणे फार अवघड. म्हणून डोळे व कान उघडे ठेवून विश्वास ठेवा.बघूया जमतं का आपल्याला
प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई
Comments
Post a Comment